ghungroo song released  
मनोरंजन

#Ghungroo 'घुंगरु' गाण्यावर नेटकरी फिदा

वृत्तसंस्था

मुंबई : हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांचा अॅक्शनपट असलेल्या 'वॉर' या चित्रपटातील 'घुंगरू' हे गाणं आज प्रदर्शित झालं. रिलीजनंतर काही वेळातच हे #Ghungroo सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे. डान्समधला एक्सपर्ट हृतिक आणि क्यूट आणि हॉट अंदाजातील वाणी कपूर या गाण्यात दिसतात. 

घुंगरूमध्ये सगळ्यात आकर्षक घेतले आहेत, ते म्हणजे लोकेशन्स! इटलीच्या पॉसिटानोमधल्या अमाल्फीच्या बीचवर हे गाणं शूट करण्यात आलंय. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच हृतिक आणि टायगर एकत्र काम करताना दिसणार आहेत. हे गाणं अरिजीत सिंग आणि शिल्पा राव यांनी गायलं आहे. तर, विशाल शेखरने त्याला म्युजिक दिलं आहे. 'घुंगरू टूट गए' या जुन्या गाण्याचं हे रिमेक आहे. 

अवघ्या चार तासांतच या गाण्याला 21 लाख लोकांनी पाहिलं आहे. तर, 16 हजार पेक्षा जास्त कमेंट्स या गाण्यावर आल्या आहेत. एका व्यक्तीने या गाण्याविषयी कमेंट करताना लिहिलं आहे की, "घुंगरू या वर्षीचं सर्वात चांगचं पार्टी सॉंग आहे आणि त्याची सिगनेचर स्टेपदेखील तितकीच जबरदस्त आहे". या गाण्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची उत्सुकता अधिक वाढली आहे. हा सिनेमा 2 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W, Playing XI: हरमनप्रीत कौरने टॉसही जिंकला, पण पाकिस्तानी कर्णधाराशी हस्तांदोलन केलं की नाही?

Amanora Park theft: हडपसरमधील अमनोरा पार्क सोसायटीत घरफोडी; साडेसात लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास

Pune Crime : बिबवेवाडी-पुरंदर रस्त्यावर लुटारू टोळीचा धुमाकूळ; रिक्षाचालक, तरुणांवर हल्ले, मोबाईल व रोकड लुटली

Pune Crime: पतीच्या अनैतिक संबंधांमुळे छळ सहन न होऊन विवाहितेने जीवन संपविले; सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात पतीवर गुन्हा

Solapur Malshiras Pickup Accident : देवदर्शन ठरले अखेरचे! सोलापूरमध्ये भीषण अपघात; पिकअप गाडी विहिरीत पडल्याने १४ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT