Gippy Grewal responds after Lawrence Bishnoi attack:  Esakal
मनोरंजन

Gippy Grewal: 'मी सलमानचा मित्र नाहीच..', लॉरेन्स बिश्नोई गँगने घरावर गोळीबार केल्यानंतर गिप्पी ग्रेवाल घाबरला!

Shooting at Gippy Grewal's house: Lawrence Bishnoi attack, Gippy panicked!

Vaishali Patil

 Gippy Grewal Reacts After Lawrence Bishnoi Attack:

पंजाबी स्टार गिप्पी ग्रेवाल हा गेल्या काही दिवसापासून खुपच चर्चेत आहे. काही दिवसांपुर्वी त्याच्या कॅनडातील घरावर गोळीबार झाला होता. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने हा हल्ला केल्याचा दावा केला होता. तशी पोस्ट देखील त्याने सोशल मिडियावर शेयर केली होती.

बिश्नोईने स्पष्टपणे सांगितले होते की, सलमान खानमुळे गिप्पी ग्रेवालच्या घरावर हा हल्ला करण्यात आला आहे. गिप्पीने सलमानला भाई म्हटले होते आणि त्याने सलमानच्या बिग बॉस या शोमध्ये आपल्या अल्बमचे प्रमोशनही केले होते.

गिप्पी आणि सलमानच्या मैत्रीमुळे त्याच्यावर हा हल्ला केला असं बोललं जात होतं. आता याप्रकरणी गिप्पी ग्रेवालची प्रतिक्रिया समोर आली आहे.

गिप्पी या हल्ल्याने घाबरला असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळेच आता त्याने सलमानसोबतची मैत्री नाकारली आहे. या संपूर्ण प्रकरणावर गिप्पी ग्रेवालने मौन सोडलं आहे.

काय म्हणाला गिप्पी?

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, एका पोर्टलशी संवाद साधताना गिप्पी ग्रेवालने गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला उत्तर दिलं आहे.

यावेळी गिप्पी म्हणाला की, "माझी सलमान खानशी मैत्री नाही. माझ्या 'मौजा ही मौजा' या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला तो आला होता कारण मी त्याला गेस्ट म्हणून बोलावलं होतं. याशिवाय आम्ही आता बिग बॉसच्या सेटवर भेटलो होतो. माझ्यासोबत जे काही घडले त्यावर माझा विश्वास बसत नाही"

लॉरेन्स गँगने दिली होती धमकी

लॉरेन्स गँगची एक फेसबुक पोस्ट व्हायरल झाली होती ज्यामध्ये असे लिहिले आहे की, सत् श्री अकाल राम राम सबनू, आज लॉरेन्स बिश्नोई गँगने व्हँकुव्हरच्या व्हाईट रॉक भागात गिप्पी ग्रेवालच्या बंगल्यावर गोळीबार केला आहे.

सलमान खानला तू खुप भाऊ- भाऊ म्हणत होतास आता तुझ्या भावाला तुला वाचवायला सांग. आणि तुझ्या भावाला सांग की, दाऊद तुला मदत करेल असा त्याचा भ्रम आहे, पण तुम्हाला आमच्यापासून कोणी वाचवू शकणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT