Robert De Niro, Robert De Niro news, Robert De Niro father, robert de niro father at the age of 71 SAKAL
मनोरंजन

Robert De Niro: गॉडफादर पुन्हा झाला फादर ! ७९ व्या वर्षी बनला सातव्या मुलाचा बाप

रॉबर्ट डी निरो सातव्या मुलाचा बाप झाला आहे. स्वतः अभिनेत्यानेच त्याचा खुलासा केला.

Devendra Jadhav

Robert De Niro News: गॉडफादर हा ऑस्कर विनिंग सिनेमा सगळ्यांना माहीतच आहे. या सिनेमात व्हिटो कॉरलियॉनची भूमिका रॉबर्ट डी निरोने साकारली आहे.

आता रॉबर्ट डी निरो पुन्हा चर्चेत आलाय. वयाच्या ७९ व्या वर्षी रॉबर्ट डी निरो बाप झाला आहे. रॉबर्ट डी निरो सातव्या मुलाचा बाप झाला आहे. स्वतः अभिनेत्यानेच त्याचा खुलासा केला.

(godfather fame actor robert de niro Became the father of the seventh child at the age of 79)

हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट डी नीरो नुकताच सातव्या अपत्याचा बाप झाला आहे. खुद्द रॉबर्टनेच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे.

79 वर्षीय ऑस्कर विजेत्या अभिनेत्याने 'अबाउट माय फादर' या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या व्यस्त आहेत. याच मुलाखतीत आयुष्यात आलेल्या या अनोख्या आनंदाचा रॉबर्टने खुलासा केला.

झालं असं की रॉबर्ट डी नीरो मुलाखतीत पालकत्वाबद्दल बोलत होते, 'मला मुलांसाठी नियम घालणे आवडत नाही, परंतु दुसरा कोणताही मार्ग नाही. आणि कोणतेही पालक, मला वाटते, तेच म्हणतील.

प्रत्येकाला नेहमीच मुलांना योग्य मार्गावर न्यायचे असते, त्यांनी योग्य ते करावे असे वाटते आणि त्यांचा फायदाही हवा असतो, पण कधी कधी असे होत नाही."

असा खुलासा रॉबर्ट डी निरो यांनी केला. जेव्हा अभिनेत्याला त्याच्या सहा मुलांबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, 'सहा नाही तर सात.' रॉबर्टने हा खुलासा केल्यावर सर्वांच्या भुवया उंचावल्या.

सातव्या मुलाचा खुलासा करताना रॉबर्ट म्हणाला, "मी नुकतेच एका मुलाचे स्वागत केले आहे." तथापि, त्याने त्याच्या कुटुंबातील नवीन सदस्य किंवा मुलाच्या आईबद्दल अधिक खुलासा केला नाही.

रॉबर्ट डी नीरोच्या प्रतिनिधीने देखील नंतर पुष्टी केली की तो खरोखर सात मुलांचा पिता होता. ऑस्कर विजेत्याला यापूर्वी सहा मुले झाली आहेत.

पहिली पत्नी डायना अॅबॉटपासून मुलगी ड्रेना आणि मुलगा राफेल. 1995 मध्ये मैत्रीण टोकी स्मिथपासून रॉबर्टची जुळी मुले ज्युलियन आणि अॅरॉन आहेत . तर दुसऱ्या पत्नीपासून, मुलगा इलियट आणि मुलगी हेलन ग्रेस. आता सातवा मुलगा झाल्याने रॉबर्टच्या आनंदाला उधाण आलंय.

'गॉडफादर' फेम अभिनेता रॉबर्ट डी नीरो हे वडील तसेच आजोबा आहेत. रॉबर्ट डी नीरोने 'द आयरिशमन', 'द गॉडफादर: पार्ट 2', 'रॅगिंग बुल', 'टॅक्सी ड्रायव्हर', 'जोकर' यासह इतर अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. अभिनेत्याने दोन ऑस्कर पुरस्कार जिंकले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खलिस्तानी पन्नूची दिलजीत दोसांजला धमकी; बिग बींच 'या' वादाशी काय आहे कनेक्शन?

पतीला प्रेयसीसह रंगेहात पकडलं, संतापलेल्या बायकोनं रस्त्यावरच चपलांनी हाणलं, प्रेयसी लॉजमधून पसार; VIDEO तुफान व्हायरल

सात महिन्यांनी आला, ऑस्ट्रेलिया दौरा गाजवला अन् रोहित शर्मा जगात भारी ठरला... ICC ची मोठी घोषणा, शुभमन गिलला केलं रिप्लेस

हॉटेलचं बिल पाहून गुजराती पर्यटकांनी पळ काढला, गाडी ट्रॅफिकमध्ये अडकली अन् फजिती झाली Video Viral

IIT Admission Without JEE: आनंदाची बातमी! आता जेईईशिवाय प्रवेश मिळणार 'या' IIT मध्ये, जाणून घ्या कसे

SCROLL FOR NEXT