GoldenGlobes2023 NaatuNaatu RRRMovie  Esakal
मनोरंजन

RRR च्या 'नाटू नाटू' ला गोल्डन ग्लोब मिळताच ट्विटरवर भारतीयांचा नाचू नाचू..

#RRRMovie #NaatuNaatu आणि #GoldenGlobes2023 ट्विटरवर ट्रेंड करू लागले.

Vaishali Patil

सध्या मनोरंजन विश्वात एकच चर्चा आहे ती एसएस राजामौली दिग्दर्शित 'आरआरआर' या चित्रपटाची.. या चित्रपटाने पुन्हा इतिहास रचला आहे. राम चरण आणि ज्युनियर एनटीआर स्टारर चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्याला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला आहे.

त्याला सर्वोत्कृष्ट ओरिजिनल गाण्याचा पुरस्कार मिळाला आहे . ही बातमी कळताच सर्व भारतीयांचा आनंद गगणाला भिडला आहे.

#RRRMovie #NaatuNaatu आणि #GoldenGlobes2023 ट्विटरवर ट्रेंड करू लागले. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते आपला आनंद व्यक्त करत आहेत.

'RRR' चित्रपट 25 मार्च 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई देखील केली. या चित्रपटात राम चरण आणि ज्युनियर एनटीआर व्यतिरिक्त अजय देवगण आणि आलिया भट्ट यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. त्यातलं 'नाटू नाटू' हे गाणंही खूप आवडलं होतं.

या गाण्याला प्रेक्षकानी डोक्यावर घेतलं. या गाण्याने अनेक रेकॉर्ड केले. आता या गाण्याने गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट ओरिजिनल गाण्याचा पुरस्कार जिंकला. यामुळे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला आहे. लोक आता त्यांचा आनंद व्यक्त करत आहेत. नेटकऱ्यांनी तर आता ट्विटरवर आरआरआरच्या 'नाटू नाटू' या गाण्याचा ट्रेण्डचं तयार केला आहे.

'नाटू नाटू' हे गाणे एम.एम. किरवणी यांनी संगीतबद्ध केले आहे. याचे गीत चंद्रबोस (Chandrabose) यांनी लिहिले असून राहुल सिपलीगुंज(Rahul Sipligunj) आणि Kaala Bhairava यांनी आवाज दिला आहे. हे गाणे हिंदीतही नाचो नाचो या शीर्षकाने रिलीज झाले आहे.

यामध्ये राम चरण आणि ज्युनियर एनटीआरने जबरदस्त डान्स केला. त्याच्या डान्स स्टेप्स खूप प्रेक्षकांना खुप आवडल्या आणि त्या गाजल्याही..अनेक कलाकारांसह सामान्यानांही या गाण्यावर डान्स करण्याचा मोह आवरला गेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

Viral: पैसे उधार घेणाऱ्यांनो लक्ष द्या...! उसने घेतलेली रक्कम वेळेत परत केली नाही तर होणार जेल अन्..., न्यायालयाचा निर्णय

SCROLL FOR NEXT