Golden Jubilee of Dada Ek Good News Aahe Marathi Drama
Golden Jubilee of Dada Ek Good News Aahe Marathi Drama 
मनोरंजन

'दादा एक गुड न्यूज आहे' च्या सुवर्णमहोत्सवी टिझर प्रदर्शित

सकाळवृत्तसेवा

बहीण भावाच्या अतूट नात्याचे दर्शन घडवणारे 'दादा एक गुड न्यूज आहे' हे नाटक लवकरच सुवर्णमहोत्सवी प्रयोग साजरा करणार आहे. शनिवार, 27 एप्रिलला पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे रात्री 9:30 वाजता तर 28 एप्रिल ला या नाटकाचा पन्नासावा प्रयोग पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी 5 वाजता होणार आहे. या निमित्ताने नाटकाचे टिझरही सर्वत्र प्रदर्शित करण्यात आले आहे. 

अल्पावधीतच या नाटकाने प्रेक्षकांना आपलंस करून अनेक पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली. परदेशातही या नाटकाला प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला. बहीण-भावाच्या नात्यातील विश्वास, प्रेम या नाटकाच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. विशेष म्हणजे प्रिया बापटने या नाटकाच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात यशस्वी पदार्पण केले आहे. सोनल प्रॉडक्शन निर्मित, अद्वैत दादरकर दिग्दर्शित या नाटकात उमेश कामत, ऋता दुर्गुळे, आरती मोरे, ऋषी मनोहर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर ह्या नाटकाचे लिखाण कल्याणी पाठारे यांनी केले आहे.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला तिसरा धक्का, कर्णधार केएल राहुलपाठोपाठ दीपक हुड्डाही आऊट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT