Goons molested Shubha Punja kannada actress while shooting Entertainment Tollywood SAKAL
मनोरंजन

Shubha Poonja: शुटिंग सुरु असतानाच लोकप्रिय अभिनेत्रीसोबत गुंडांनी केलं गैरवर्तन, चाकुचा धाक दाखवून...

भर शुटिंगमध्ये लोकप्रिय अभिनेत्रीसोबत गुंडांनी गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना घडली

Devendra Jadhav

Shubha Punja News: कर्नाटकमधील लोकप्रिय अभिनेत्री शुभा पुंजासोबत धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलंय.

कर्नाटकातील चिक्कमगलुरु जिल्ह्यात शनिवारी एका चित्रपटाच्या शूटिंग सेटवर घुसलेल्या काही गुंडांनी शुभा सोबत गैरवर्तन केल्याची माहिती समोर येत आहे.

(Goons molested Shubha Punja kannada actress while shooting)

न्युज कर्नाटकाने दिलेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध अभिनेत्री शुभा पुंजा कन्नड चित्रपट ‘कोरगज्जा’ साठी गाण्याचं शुटिंग करत होती.

या गाण्याचं शुटिंग सुरु असताना बाईकवरून काही गुंड धारदार शस्त्रे घेऊन शूटिंग परिसरात घुसले. त्यांनी शुभाशी गैरवर्तन केले, तिचा हात धरला आणि तिला ओढण्याचाही प्रयत्न केला. या घटनेनंतर शूटिंग थांबवण्यात आले. (Latest Entertainment News)

ही घटना कुदुरेमुख पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली, परंतु चित्रपटाच्या क्रूने अद्याप या संदर्भात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाही.

चित्रपटाचे दिग्दर्शक सुधीर अट्टावरा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, "लाखो रुपये खर्च करून सेट बांधण्यापूर्वी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची आवश्यक परवानगी घेतली होती. या टीमने बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य यांचीही नियुक्ती केली होती. आमचे लाखो रुपये पणाला लागले आहेत"

दरम्यान "या घटनेबाबत तक्रार आल्यास कारवाई करू", असं पोलिसांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Dry Day राज्यात २९ ठिकाणी ४ दिवस ड्राय डे, १३ ते १६ जानेवारीपर्यंत मद्यपानास मनाई

Stock Market Today : जागतिक अस्थिरतेमुळे शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 500 अंकांनी खाली; सोनं मात्र तेजीत; कोणत्या शेअर्सला फटका?

T20 World Cup : बांगलादेशची ICC कडून कोंडी! देश नव्हे, फक्त शहर बदलण्याचा ठेवला प्रस्ताव; हेही मान्य न केल्यास...

Bigg Boss विजेता शिव ठाकरे अडकला विवाहबंधनात, गुपचूप बांधली लग्नगाठ, सोशल मीडियावर लग्नातले फोटो व्हायरल

MLA Sangram Jagtap: व्हीजनरी उमेदवार निवडून द्यावेत:आमदार संग्राम जगताप; सुख- दुःखात साथ देणाऱ्यांच्या पाठीशी रहा!

SCROLL FOR NEXT