Govinda, Rashmika Mandanna News Govinda, Rashmika Mandanna News
मनोरंजन

Govinda & Rashmika : गोविंदा झाला रश्मिका मंदानाचा ‘सामी’; दोघांनी केला डान्स

रश्मिका मंदानाला सुपरस्टार गोविंदाला भेटण्याची संधी मिळाली

सकाळ डिजिटल टीम

Govinda, Rashmika Mandanna News पुष्पा फेम अभिनेत्री रश्मिका मंदानाला (Rashmika Mandanna) नुकतीच सुपरस्टार गोविंदाला भेटण्याची संधी मिळाली. गोविंदा (Govinda) आणि रश्मिकाची जुगलबंदी पाहून चाहत्यांमध्ये चांगलाच उत्साह संचारला होता. दोघांनी एकत्र स्टेजवर डान्सही केला. ९० च्या दशकातील सुपरस्टार अभिनेता गोविंदा आजही प्रत्येक गाण्यावर अशा प्रकारे परफॉर्म करतो की पाहणारा पाहतच राहतो.

डीआयडी सुपर मॉम्सच्या ग्रँड फिनालेमध्ये गोविंदा आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) पाहुणे म्हणून सेटवर आले होते. पुष्पा चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत मुख्य भूमिकेत दिसलेली रश्मिका मंदानाचे सामी सामी हे गाणे सुपरहिट झाले आहे. येथे गोविंदा (Govinda) आणि रश्मिकाने याच गाण्यावर डान्स केला.

पुष्पानंतर चाहते अल्लू अर्जुनच्या पुष्पा २ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा पहिला भाग सुपरहिट ठरला होता. दुसऱ्या भागातही रश्मिका मंदाना आपल्या स्टाईलची जादू दाखवणार आहे. साऊथची सुपरहिट अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने आता हिंदी चित्रपटांमध्येही पाऊल ठेवण्यास सुरुवात केली आहे.

रश्मिका मंदाना लवकरच अमिताभ बच्चन यांच्यासोबत गुडबाय चित्रपटात काम करताना दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, चांगला प्रतिसाद मिळाला आहे. एका मुलाखतीत अमिताभ बच्चन यांना पहिल्यांदा भेटल्याचा अनुभव सांगताना रश्मिकाने सांगितले की, मी त्यांना भेटून प्रभावित झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: फेरीवाल्यांसाठी आता पोलीस व्हेरिफिकेशन आणि क्यूआर कोड लायसन्स अनिवार्य; पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय

IPL 2026: शुभमन गिलने विराटचा तो विक्रम मोडत नवा इतिहास घडवला; बटरनेही किंग कोहलीच्या यादीत मिळवलं स्थान

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार हा अवमान नव्हे, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय, चौकशीची मागणी करणाऱ्या महिलेवरील गुन्हा रद्द

Free FASTag Money: आता मिळणार 1,000 रुपयांचा FASTag फ्री! फक्त एक काम करायचं, सरकारची नवी भन्नाट योजना

शरद पोंक्षेंना तिसऱ्या स्टेज कॅन्सरची कल्पनाच नव्हती; पत्नीनं सांगितला किस्सा, स्वत: केले आयुर्वेदिक उपचार

SCROLL FOR NEXT