Grammy Awards 2024 Shankar Mahadevan Zakir Hussain win Best Global Music Album award check complete list marathi news  
मनोरंजन

Grammy Awards 2024 : गौरवास्पद! शंकर महादेवन, झाकीर हुसेन यांनी जिंकला ग्रॅमी; येथे वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी

Grammy Awards 2024 : लॉस एंजेलिसमध्ये 66 व्या ग्रॅमी पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते

रोहित कणसे

लॉस एंजेलिसमध्ये 66 व्या ग्रॅमी पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये गायक टेलर स्विफ्ट, ऑलिव्हिया रॉड्रिगो, मायली सायरस आणि लाना डेल रे यांनी यावर्षी ग्रॅमी पुरस्कार जिंकले आहेत.

यादरम्यान ग्रॅमी अवॉर्ड्स 2024 मध्ये भारतीय संगीतकारांचे वर्चस्व देखील पाहायला मिळालं. यंदा भारतीय गायक शंकर महादेवन आणि तबलावादक झाकीर हुसेन यांच्यासह चार संगीतकारांनी हा पुरस्कार जिंकला आहे. तर गायिका मायली सायरसने तिच्या कारकिर्दीतील पहिला ग्रॅमी पटकावला. महत्वाचे म्हणजे यंदा एसझेडएचे या वर्षीच्या ग्रॅमी नामांकनांमध्ये वर्चस्व पाहायला मिळालं.

संगीत उद्योगातील उत्कृष्ट कामगिरीसाठी युनायटेड स्टेट्सच्या रेकॉर्डिंग अकादमीद्वारे कलाकारांना ग्रॅमी पुरस्कार दिले जातात. प्रसिद्ध विनोदी अभिनेता ट्रेव्हर नोआ याने सलग चौथ्यांदा ग्रॅमी पुरस्कार होस्ट केले.

ग्रॅमी पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी

सर्वोत्कृष्ट पॉप सोलो परफॉर्मन्स: मायली सायरस (फ्लॉवर)

सर्वोत्कृष्ट अल्बम: एसझेडए (SOS)

बेस्ट परफॉर्मन्स: कोको जोन्स (ICU)

रॅप अल्बम: किलर माइक (मायकल)

बेस्ट आफ्रिकन म्युझिक परफॉर्मन्स: टायला (वॉटर)

पॉप ड्युओ/ग्रुप परफॉर्मन्स: एसझेडए, फोबी ब्रिजर्स (घोस्ट इन द मशीन)

म्युझीक व्हिडिओ: द बीटल्स, जोनाथन क्लाइड, एम कूपर (आय एम ओनली स्लीपिंग)

ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स: झाकीर हुसेन, बेला फेक, एडगर मेयर (पश्तो)

अल्टरनेटीव्ह म्युझिक अल्बम: बॉयजिनियस (द रेकॉर्ड)

ग्लोबल म्युझिक अल्बम: शक्ती (द मोमेंट)

प्रोड्युसर ऑफ द इयर, नॉन-क्लासिकल: जॅक अँटोनॉफ

प्रोड्युसर ऑफ द इयर, क्लासिकल : अलेन मार्टोन

बेस्ट इंजिनियर्ड अल्बम, क्लासिकल: रिकार्डो मुटी आणि सिम्फनी ऑर्केस्ट्रा

बेस्ट ब्लूग्रास अल्बम: मॉली टर्टल आणि गोल्डन हायवे (सिटी ऑफ गोल्ड)

बेस्ट कंटेम्पररी इंस्ट्रूमेंटल अल्बम: बेला फेक, झाकीर हुसेन, एडगर मेयर, राकेश चौरसिया (एज वी स्पीक)

बेस्ट जॅझ परफॉर्मन्स अल्बम: बिली चाइल्ड्स (द विंड ऑफ चेंज)

बेस्ट जॅझ परफॉर्मन्स: समारा जॉय (टाइट)

बेस्ट प्रोग्रेसीव्ह R&B अल्बम: SZA (SOS)

बेस्ट कंट्री ड्युओ/ग्रुप परफॉर्मन्स: झॅक ब्रायन, कॅसी मस्ग्रेव्ह्स (आय रिमेंबर एव्हरीथींग)

बेस्ट रॉक परफॉर्मन्स: बॉयजिनियस (नॉट स्ट्राँग इनफ)

बेस्ट मेटल परफॉर्मन्स: मेटालिका (72 सीझन)

बेस्ट रॉक साँग: बॉयजिनियस (नॉट स्ट्राँग इनफ)

बेस्ट रॉक अल्बम: परमोर (दिस इज व्हाय)

बेस्ट अल्टरनेटिव्ह म्युझिक परफॉर्मन्स: परमोर (दिस इज व्हाय)

बेस्ट अल्टरनेटिव्ह म्युझिक परफॉर्मन्स : बॉयजिनियस (द रेकॉर्ड)

बेस्ट म्युझिकल थिएटर अल्बम: सम लाइक इट हॉट

सर्वोत्कृष्ट कॉमेडी अल्बम: डेव्ह शपेल (व्हाट इन अ नेम)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT