Tori Kelly Health Update Esakal
मनोरंजन

Tori Kelly Health: ग्रॅमी विजेती सिंगर जेवता जेवता जमीनीवर कोसळली! आता कशी..

टोरीनं एक पोस्ट सोशल मिडियावर शेयर केली आणि चाहत्यांना तिच्या तब्येतीविषयी माहिती दिली आहे.

Vaishali Patil

Tori Kelly Health Update: काही दिवसांपूर्वी हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका टोरी केली हिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिला अचानक काय झाले की त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असे अनेक प्रश्न तिच्या चाहत्यांना पडले होते.

आता टोरीनं तिची तब्येत अचनाक का खराब झाली आणि आता ती कशी आहे याबाबात हेल्थ अपडेट दिली आहे. तिच्या चाहत्यांना या बाबत सांगतांना टोरीनं एक पोस्ट सोशल मिडियावर शेयर केली होती.

तिच्या चाहत्यांना तिची होत असलेली चिंता पाहत टोरीने तिच्या आजारपणात चाहत्यांसाठी सोशल मीडियावर एक नोट शेअर केली आहे. या नोटमध्ये तिने सांगितले की ती आता डॉक्टर आणि नर्स यांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहे आणि आता तिला पुर्वीपेक्षा बरं वाटतं आहे.

(Grammy-Winning American singer Tori Kelly)

ग्रॅमी विजेती अमेरिकन सिंगर टोरी ही 25 जुलैच्या रात्री जेवतांना अचानक खुर्चीवरून जमीनीवर पडली. अचानक तिची तब्येत बिघडली होती. त्यांनतर तिला रुग्णालयात दाखलं केलं. तपासणीनंतर टोरीच्या शरिराच्या अनेक अवयवांभोवती रक्ताच्या गाठी झाल्याचं समोर आलं आहे. ती आता यावर उपचार घेत आहे.

सिंगरनं चाहत्यांना सागितलं की, या आठवड्यात तिचे काही प्लॅन होते. तिचे एक गाणे देखील प्रसिद्ध होणार होते. ते गाणंही येणार आहे. माझ्या या वाईट काळात माझी मदत करणाऱ्या आणि माझ्यासोबत असलेल्या लोकांचे आभार तुम्ही केलेल्या प्रार्थनेमुळेच मी लवकर बरी झाली. आता मी माझं गाणं रिलिज करत आहे. मी तुम्हाला दिलेलं वचन पुर्ण करत आहे.

टोरीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर तिने 2018 साली जर्मनीतील व्यावसायिक बास्केटबॉल खेळाडू आंद्रे मुरिलोशी लग्न केलं. दोघंही टॉप अन् पावर कपल म्हणुन ओळखले जातात. दोघांची फॅन फॉलोविंगही तगडी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT