Gautami Patil  esakal
मनोरंजन

Gautami Patil: सांगलीची सुपारी गौतमीला महागात पडली?

गौतमी पाटील कोण असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर काय असेल हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही.

सकाळ डिजिटल टीम

Guatami Patil: गौतमी पाटील कोण असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर काय असेल हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही. गौतमीचा कार्यक्रम कुठेही असला तरी त्याठिकाणी हजारोंच्या संख्येनं तिचे चाहते गर्दी करत असल्याचे दिसून आले आहे. दोन दिवसांपूर्वी तिचा सांगली जिल्ह्यातील एका गावात झालेल्या कार्यक्रमानं अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. त्या कार्यक्रमाला झालेल्या गर्दीमुळे जवळच असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले होते. आता गौतमी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

गौतमीचा लावणीचा कार्यक्रम सुरु होता. त्याचवेळी घटनास्थळी एक मृतदेह आढल्यानं एकच खळबळ उडाली होती. त्यावरुन गौतमीनं काल पुण्यात प्रेस कॉन्फरस घेतली. यावेळी तिनं दिलेल्या उत्तरांची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. गौतमीनं आपण कोण आहोत, कुठून आलोत, आपल्यावरील आरोप कसे खोटे आहेत याविषयी सांगितले होते. त्यामुळे तिच्यावर सुरु झालेल्या चर्चेनं वेगळे वळण घेतल्याचे दिसून आले होते. गौतमीनं फार कमी वयातच कौटूंबिक परिस्थितीमुळे आपल्यावर जबाबदारी येऊन पडली. अशातच आपण लावणी शिकलो आणि परफॉर्मन्स करु लागलो.

गौतमीनं आपल्यावर होणाऱ्या टीकेवर परखडपणे उत्तर दिलं आहे. माझ्यावर विनाकारण आरोप केले जात आहे. त्यात तथ्य नाही. तो मृतदेह कुणाचा, तिथे तो कसा आला हे मला काही माहिती नाही. येत्या काळात माझ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे वेळापत्रक व्यस्त असून त्यातून जराही सुटका नसल्याचे गौतमीनं सांगितले होते. मात्र यासगळ्यात सांगलीची सुपारी गौतमीला महागात पडल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे. त्यामुळे की काय गौतमीवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

गौतमीनं त्या प्रेसमध्ये सांगितले होते की, मी कोल्हापूरची नाही. तर धुळ्याची आहे. शिंदखेडा येथील गावात माझा जन्म झाला. तिथेच मोठी झाली. मी तिथून आठवीत असताना पुण्यात आले. शिक्षण कमी झालंय. त्यानंतर मी नृत्य क्षेत्रात आली. आणि माझा प्रवास सुरु झाल्याचे गौतमीनं म्हटले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nandigram Bypoll : पश्चिम बंगालमधील नंदीग्राम पोटनिवडणुकीआधी मोठा ट्विस्ट; ममता बॅनर्जींच्या उमेदवाराची अचानक माघार, नेमकं काय घडलं?

LP Gas Tanker Accident: वाडाखडकोना येथे एलपी गॅस टँकर कलंडला; गळती न झाल्याने मोठा अनर्थ टळला

Festival Makeup Skin Care: सणासुदीला मेकअपमुळे त्वचा बिघडतेय? १० मिनिटांत करा ‘हा’ घरगुती राइस जेल; चेहरा दिसेल फ्रेश

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Pali Stray Dogs: पालीत भटक्या कुत्र्यांचा कहर; १० वर्षांच्या चिमुरडीसह भाविक महिलेला चावा

SCROLL FOR NEXT