siddhant 
मनोरंजन

'गली बॉय' फेम अभिनेता सिद्धार्थ चतुर्वेदीने बीचवर केलेला डान्स होतोय व्हायरल..

सकाळ डिजिटल टीम

मुंबई- गली बॉय सिनेमात रणवीर सिंहच्या कामाचे जेवढं कौतुक झालं तेवढंच सहकलाकार सिद्धांत चतुर्वेदीचंही झालं. सिद्धांतच्या चाहत्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर आहे. सिद्धांत सोशल मिडियावरही चांगलाच ऍक्टीव्ह असतो. गली बॉयमधील त्याच्या भूमिकेने तरुणी तर त्याच्या प्रेमात पडल्या आहेत. नुकतंच सिद्धांतचं धूप हे गाणं प्रदर्शित झालंय. हे गाणं सिद्धांतने स्वतः गायलंय आणि या गाण्याचे बोल देखील त्यानेच लिहिले आहेत. या गाण्याला सिद्धांतच्या चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सोशल मिडियावर सिद्धांतचा एक लेटेस्ट डान्स व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तो ईड शिरीनच्या गाण्यावर बीचवर डान्स करताना दिसतोय. सिद्धांतने त्याचा हा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. सिद्धांतने हा डान्स व्हिडिओ शेअर केल्यानंतर पुन्हा एकदा व्हिडिओ पोस्ट केला आणि सांगितली की आधी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये काहीतरी गडबड होती. या व्हिडिओमध्ये सिद्धांत बीचवर ईड शिरीनचं गाणं ऑटम लीव्स वर डान्स करतोय.

सिद्धांतने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय, तुम्ही मैलो दूर आहोत. आणि काल तुम्ही माझ्यासोबत इथेच होतात. हा व्हिडिओ पुन्हा एकदा अपलोड केला कारण आधीच्या व्हिडिओमध्ये काहीतरी गडबड झाली होती. सिद्धांतचा हा व्हिडिओ आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. चाहत्यांनी या व्हिडिओवर कमेंट करुन त्याच्या डान्सचं कौतुक केलं आहे. 

सिद्धांत चतुर्वैदी जोया अख्तर दिग्दर्शित गली बॉय या सिनेमात झळकला होता. त्याच्या अभिनयाचं प्रेक्षकांकडून कौतुक झालं होतं. या सिनेमात सिद्धांत रॅपर एमसी शेरच्या भूमिकेत दिसून आला होता. सिद्धांत लवकरंच यशराज फिल्म्सच्या बंटी ऑर बबली २ या सिनेमात झळकणार आहे तसंच करण जोहरा आगामी नाव जाहीर न झालेल्या सिनेमातही त्याची वर्णी लागली आहे.   

gully boy actor siddhant chaturvedi dances on the beach watch video 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निपाणीत भीषण अपघात; ट्रॅक्टर-ट्रॉलीचे चाक डोक्यावरून गेल्याने प्रसिद्ध व्यावसायिक जागीच ठार, डोक्‍याचा झाला चेंदामेंदा, ओळखही पटत नव्हती!

Success Story : दिवंगत वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी मेहनतीने लढली..., कोल्हापूरच्या लेकीने PSI होत राज्याचा मानाचा ‘रिव्हॉल्व्हर ऑफ ऑनर’ मिळवला बहुमान

Minister Jaykumar Gore: युती होणार, कोणीच रोखू शकत नाही; पालकमंत्री जयकुमार गोरे, युती रखडली का? यावर काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update : खेड-शिवापूर टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा, दीड किलो मीटरपर्यंत वाहतूक खोळंबली

Horrible Accident: मदतीसाठी किंकाळ्या, पण दार उघडलेच नाही… 17 जीव आगीत होरपळले, भीषण बस दुर्घटना!

SCROLL FOR NEXT