Haddi Trailer Nawazuddin Siddiqui Anurag Kashyap  esakal
मनोरंजन

Haddi Trailer : 'आमचा आशीर्वाद सगळ्यात शक्तिशाली असतो आणि शाप..! नवाझुद्दीनचा आजवरचा सगळ्यात कडक परफॉर्मन्स

बऱ्याच दिवसांपासून नवाझुद्दीनच्या हड्डी या चित्रपटाविषयी चर्चा सुरु होती. अखेर त्याचा ट्रेलर आला आहे.

युगंधर ताजणे

Haddi Trailer Nawazuddin Siddiqui Anurag Kashyap : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता नवाझुद्दीन सिद्धिकीच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा हड्डी चित्रपटाचा ट्रेलर आता सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. त्या चित्रपटातील नवाझुद्दीनच्या भूमिकेनं चाहत्यांना वेडं केलं आहे. नवाझुद्दीनचा दमदार अभिनय, आणि संवादफेकीनं हा चित्रपट प्रेक्षकांना आगळी वेगळी ट्रीट ठरणार आहे.

बऱ्याच दिवसांपासून नवाझुद्दीनच्या हड्डी या चित्रपटाविषयी चर्चा सुरु होती. अखेर त्याचा ट्रेलर आला आहे. अक्षत अजय शर्मा दिग्दर्शित या चित्रपटामध्ये एकुण ३०० तृतीयपंथीयांनी भूमिका साकारल्या आहेत. अॅक्शन, क्राईम आणि ड्रामा या प्रकारातील चित्रपटानं प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे.

Also Read - दिल्लीतल्या केवळ प्रशासकीय बदल्यांपुरतंच मर्यादित नाही, दिल्ली सेवा विधेयक. काय आहेत

हड्डीमधील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यातील संवाद फारच प्रभावी आहे. आम्ही लोकं जेव्हा आशीर्वाद देतो तेव्हा तो खूपच शक्तिशाली असतो. मात्र जेव्हा शाप देतो तेव्हा तो फारच भयंकरही असतो. अशा शब्दांत तृतीय पंथीयांच्या वेशभूषेतील नवाझुद्दीन बोलतो तेव्हा त्याची प्रतिक्रिया खूप काही सांगून जाणारी असते. या चित्रपटातील वेशभूषा, त्या पात्रांचे जीवन आणि त्यांचा संघर्ष हा लक्ष वेधून घेणारा आहे.

नवाझुद्दीनचा हा चित्रपट झी ५ वर प्रदर्शित होणार असून त्यामध्ये अनुराग कश्यप, इला अरुण, मोहम्मद झिशान अय्यूब, सौरभ सचदेव, श्रीधर दुबे, राजेश कुमार, विपिन शर्मा आणि सहर्ष शुक्ला यांच्या भूमिका आहेत. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची प्रेक्षकांना मोठी उत्सुकता आहे. त्याच्या व्हायरल फर्स्ट पोस्टरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाचा प्रीमिअर ७ सप्टेंबर रोजी होणार आहे.

पहिल्यांदा जेव्हा या चित्रपटाचा पोस्टर व्हायरल झाला होता त्यावेळी नवाझुद्दीनच्या लूकचे खूपच कौतुक झाले होते. त्यातील त्याच्या मेहनतीविषयी प्रेक्षकांना उत्सुकता आहे. त्यावर त्याचे व्हायरल झालेल्या मुलाखती खूप काही सांगून जाणाऱ्या आहेत. नवाझुद्दीन पहिल्यांदाच तृतीयपंथीयाची भूमिका करत आहे. त्यामुळे त्याच्या या भूमिकेविषयी चाहत्यांना खूपच कुतूहल आहे.

नवाझुद्दीनचा हड्डीतील साडीच्या वेशभूषेतील लूक व्हायरल झाला तेव्हा त्यावरुन वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. तो फोटो पाहून अनेकांना अभिनेत्री अर्चना पुरन सिंग यांची आठवण आली होती. अर्चना पुरन सिंग यांना ट्रोल करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना, काही जण अडकल्याची भीती; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Nagpur Leopard Rescue : इंजेक्शन मारलं अन् जाळीत पकडलं; भरवस्तीत शिरलेला बिबट्या जेरबंद, रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक घटनाक्रम

Kitchen Hacks: हिवाळ्यात सहज सेट होईल मलाईदार दही; जाणून घ्या एकदम सोपा घरेलू उपाय

Stree Mukti Parishad : स्वातंत्र्याचा वारसा सांभाळणे काळाची गरज; धार्मिक बंधनेच महिलांवरील अत्याचारांचे मूळ: लीलाताई चितळे

फक्त दीड लाख लोकसंख्या असलेला देश फीफा वर्ल्डकपसाठी पात्र; प्रशिक्षकाच्या अनुपस्थितीत घडवला इतिहास

SCROLL FOR NEXT