Half CA Trailer Viral Social Media 26 July Relased Date  esakal
मनोरंजन

Half CA Trailer: कितवा प्रयत्न? C.A करणाऱ्याला असा प्रश्न विचारायचा नसतो!

गेल्या काही महिन्यांपासून ओटीटीवर स्टुडंट बेस मालिका आणि चित्रपटांनी प्रेक्षकांनी लक्ष वेधून घेतले होते.

युगंधर ताजणे

Half CA Trailer Viral Social Media 26 July Relased Date : टीव्ही मनोरंजन विश्वाला मोठी टक्कर ओटीटी माध्यमानं दिली. कोरोनाच्या काळात तर ओटीटीचा प्रचार अन् प्रसार हा वेगानं झाला होता. आता ओटीटी मीडियाची क्रेझ प्रचंड प्रमाणात वाढली आहे. सध्या ओटीटीचा प्रेक्षकवर्ग वेगानं वाढतो आहे. त्याला मिळणारा प्रतिसाद प्रचंड आहे. अशातच टीव्हीएफच्या आणखी एका मालिकेनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून ओटीटीवर स्टुडंट बेस मालिका आणि चित्रपटांनी प्रेक्षकांनी लक्ष वेधून घेतले होते. त्यात कोटा फॅक्टरी, अॅस्पिरेशन आणि संदीप भैय्या नावाच्या मालिकांनी प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले होते. संदीप भैय्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्या मालिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. त्यावरुन आलेल्या प्रतिक्रियाही भन्नाट होत्या. आता तर हाफ सीए नावाच्या मालिकेचा ट्रेलर व्हायरल झाला आहे. त्याला मिळालेला प्रतिसाद मोठा आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

भारतातील सर्वाधिक कठीण परिक्षांमध्ये सीए परिक्षेचा उल्लेख केला जातो. लाखो विद्यार्थ्यांमधून केवळ शंभर ते दोनशे विद्यार्थी ही परिक्षा उत्तीर्ण होतात. या परिक्षेची काठिण्यपातळी प्रचंड कठीण असल्यानं चार ते पाच वेळा परिक्षा देऊनही त्यात अपयश आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. हाफ सीएच्या व्हायरल झालेल्या ट्रेलरची सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारची चर्चा रंगली आहे.

चित्रपटाचा ट्रेलर सुरु होतो तेव्हा त्यामध्ये एखाद्या मुलीला तिचे वय, मुलाला गणितात मिळालेले मार्क्स आणि एखाद्यानं युपीएससी किंवा सीएची परिक्षा कितीवेळा दिली हे विचारायचं नसतं. असं वाक्य आपल्या कानी पडतं. त्यानंतर चित्रपटाचा विषय, त्यातील पात्र आणि त्या पात्रांच्या तोंडचा संवाद आपले लक्ष वेधून घेतो. एकुणच हाफ सीएच्या ट्रेलरनं प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे.

कॉमर्स स्ट्रीमविषयी नेहमीच वेगळ्या अँगलनं बोलले जाते. त्यांना भविष्यात काय संधी आहेत, ते आणखी कशात करिअऱ करु शकतात याविषयी देखील अनेकांना कुतूहल असते. अशातच हाफ सीएमधून वेगवेगळ्या विषयांना दिग्दर्शकानं समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला मिळालेला प्रतिसादही मोठा असल्याचे दिसून आले आहे. नेटकऱ्यांनी त्या ट्रेलरचे कौतूक केले आहे.

अॅमेझॉन मिनी प्राईमवर ही मलिका २६ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यात एहसास चन्ना, प्रीत कमानी, ज्ञानेंद्र त्रिपाठी, अनमोल कजानी आणि रोहन जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hidu Rashtra: भारत हिंदुराष्ट्र कधीपर्यंत होणार? डेडलाईन आली; शंकराचार्यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगून टाकलं

तुलसी २.० ची पहिली झलक- ‘क्यूँकी सास भी कभी बहू थी २’चा नॉस्टॅल्जिया पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!

Video : क्षणभराच्या रागात गेला जीव! निर्दयी माणसानं किरकोळ भांडणात तरुणाला धावत्या रेल्वेतून ढकललं; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील रामवाडीमध्ये पेट्रोल चोराने जाळल्या सहा मोटरसायकल

'चला हवा...'मध्ये निलेशच्या जागी अभिजीतच्या दिसण्यावर श्रेया बुगडेची प्रतिक्रिया; म्हणाली- तुला एकच गोष्ट सांगायला आवडेल की...

SCROLL FOR NEXT