Hansal Mehta News esakal
मनोरंजन

Hansal Mehta: 'कंगनासोबत काम करण्याचा सगळ्यात मोठा पश्चाताप!'

मला अजुनही कंगनासोबत जो धाकड चित्रपट केला त्याचा पश्चाताप होत असल्याचे मेहता यांनी म्हटले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Kangana Ranaut: स्कॅम 1992 चे निर्माता आणि दिग्दर्शक हंसल मेहता हे नेहमीच त्यांच्या कलाकृतीसाठी ओळखले जाणारे सेलिब्रेटी आहे. चित्रपट क्षेत्रातून त्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर केलेलं पदार्पण नेटकऱ्यांना भावलं. त्यांच्या पहिल्याच (Bollywood Director Hansal Mehta) मालिकेला प्रचंड यश मिळाल्याचे दिसून आले आहे. कोट्यवधीचा घोटाळा करणाऱ्या हर्षद मेहतावर आधारित स्कॅम 1992 मालिकेला प्रेक्षकांची अमाप लोकप्रियता मिळाली. हंसल मेहता हे नेहमीच त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियांमुळे देखील चर्चेत असतात. आता त्यांनी प्रसिद्ध अभिनेत्री कंगनावर केलेली कॉमेंट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

कंगना आणि हंसल मेहता यांचे यापूर्वी देखील अनेकदा खटके उडाले आहेत. मेहता यांनी दोन चित्रपट कंगनासोबत केले होते. या गोष्टीचा त्यांना नेहमीच पश्चाताप होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मेहता यांनी सध्या चर्चेत असलेल्या ब्रम्हास्त्रवर दिलेली प्रतिक्रिया प्रेक्षकांना भावली आहे. त्यांनी ब्रम्हास्त्रचं कौतूक करुन हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करेल. असा अंदाज व्यक्त केला आहे. एकीकडे ब्रम्हास्त्रवर सोशल मीडियावरून टीका होत असताना मेहता यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरुन नेटकऱ्यांनी त्यांना उलट सुलट प्रश्नही विचारले आहेत.

नेटकऱ्यांनी मेहता यांना ट्रोल करुन प्रतिक्रिया दिली आहे. त्यात म्हटले होते की, तुम्ही कंगनाचा धाकड मुव्ही करुन तिला फ्लॉप केले होते. त्यावर मेहता यांनी दिलेली प्रतिक्रिया ही चर्चेत आली आहे. त्यांनी आपल्याला हा चित्रपट करायचा नव्हता. तो मी केला आणि आता त्याचा पश्चाताप होत असल्याचे म्हटले आहे. कंगनावर अशी प्रतिक्रिया दिल्यानं तिच्या चाहत्यांनी मेहता यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी मेहता आणि कंगना यांच्यातील सोशल मीडियावर रंगलेला वाद चाहत्यांच्या लक्षात असल्याचे यानिमित्तानं दिसून आले आहे.

hansal mehta tweet

मेहता यांनी त्या युझर्सला दिलेल्या उत्तरात असं म्हटलं आहे की, याच वर्षी कंगनाचा धाकड प्रदर्शित झाला. त्याला अपेक्षित असा प्रतिसाद काही मिळाला नाही. तो मिळेल अशी अपेक्षा होती. तसे काही झाले नाही. 25 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाला अजिबात प्रतिसाद मिळाला नाही. हा चित्रपट सुपरफ्लॉप झाला. त्यानं फक्त दहा कोटींची कमाई केली होती. म्हणून मला अजुनही तो चित्रपट केल्याचा पश्चाताप होत असल्याचे मेहता यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT