Dunki  SAKAL
मनोरंजन

Hansal Mehta On Dunki: सिनेमा परफेक्ट नाही पण...हंसल मेहतांना राजकुमार हिरानी अन् शाहरुखचा 'डंकी' कसा वाटला?

राजकुमार हिरानी दिग्दर्शित डंकी हा शाहरुखचा या वर्षातील तिसरा चित्रपट आहे.

Vaishali Patil

Hansal Mehta On Dunki: बॉलिवूडचा किंग म्हणजेच शाहरुख खान हा सध्या त्याच्या 'डंकी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा सिनेमा 21 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला . मात्र या चित्रपटाला प्रेक्षक आणि समिक्षकांनी संमिश्र प्रतिसाद दिला आहे. 'डंकी' बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई करत आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित डंकी हा शाहरुखचा या वर्षातील तिसरा चित्रपट आहे.

हा सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षकांनीच नाही तर अनेक सेलिब्रिटींनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. आता प्रसिद्ध चित्रपट निर्माते हंसल मेहता यांनीही डंकी हा चित्रपट पाहिला आणि त्याचा रिव्ह्यू शेअर केला आहे. डंकी पाहिल्यानंतर त्यांना काय वाटले, चित्रपटाची कथा आणि शाहरुखचा अभिनय या बऱ्याच विषयावर त्यानी आपल्या ट्विटमध्ये भाष्य केले आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर हंसल मेहता यांनी लिहिले, 'मला 'डंकी' खूप आवडला. परफेक्ट नाही आहे, पण तरी काय झालं तो परिपूर्ण आहे. या चित्रपटाने मला ते सर्व दिलं जे मी मिस करत होतो. तो नॉस्टॅल्जिक, हृदयस्पर्शी, साधा आणि आमच्या चित्रपटांसाठी एक आदर्श आहे. मला वाटतं हा असा सिनेमा नाही आहे ज्याचा मी जास्त विश्लेषण करु इच्छितो. मला कोणत्याही दिवशी राजकुमार हिराणीचा चित्रपट द्या.'

'शाहरुख तुमच्या हृदयाला भिडतो , त्याच्या डोळ्यात प्रेम आहे. याशिवाय एक हलकीफुलकी भूमिका साकारून त्याने वर्षाचा शेवट केला आहे.

या सिनेमात कोणताही ड्रामा नाही, तो विनोदी नाही, शोकांतिका नाही किंवा थ्रिलरही नाही. हा पूर्णपणे राजकुमार हिराणीचा चित्रपट आहे. तुम्ही स्वतःच जाऊन बघा आणि तुम्हीच ठरवा.'

'डंकी' केवळ देशातच नाही तर जगभरात धुमाकूळ घालत आहे. देशांतर्गत चित्रपटाने 130 कोटींचा गल्ला जमवला आहे. तर जगभरात 211.13 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये चित्रपटाने चांगली कमाई केली.

शाहरुख खान आणि तापसी पन्नू स्टारर चित्रपट डंकी 21 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. 'डंकी'चे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले आहे. शाहरुख खान व्यतिरिक्त विकी कौशल, बोमन इराणी यांच्यासह अनेक कलाकारांनी या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अशोक खरातच्या अत्यंत जवळच्या माणसाचा अपघाती मृत्यू; शिर्डी जमीन घोटाळ्यात होते साक्षीदार

Fake Alphonso Mango in Nipani : हापूसच्या पेटीत कर्नाटकी आंबा! बाजारात ग्राहकांची मोठी फसवणूक; 700 ते 800 रुपये दराने मिळतोय आंबा

Latest Marathi News Live Update: अशोक खरातच्या ओकस कार्यालयात ईडीकडून गेल्या तीन तासांपासून झडती सुरू

Pune Sugar Protest: शेतकऱ्यांचा एल्गार!घामाच्या पैशासाठी 'आरपार'ची लढाई; ३० एप्रिलपासून पुण्यातील साखर संकुलाला बेमुदत वेढा..

Success Story: ग्रामीण भागातून न्यायालयापर्यंतचा प्रवास; कल्पेश कड न्यायाधीशपदी विराजमान, जिद्द आणि मेहनतीचा विजय!

SCROLL FOR NEXT