HanuMan Box Office Collection Day 9  esakal
मनोरंजन

HanuMan Box Office Collection Day 9 : जय श्रीराम! 'हनुमान'ची बॉक्स ऑफिसवर गरुडझेप, '155 कोटीं'ची कमाई

बॉलीवूडमध्ये हनुमानची इंट्री (HanuMan Movie News) झाली आणि त्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळालेला दिसून आला आहे.

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

HanuMan Box Office Collection Day 9 : बॉलीवूडमध्ये हनुमानची इंट्री (HanuMan Movie News) झाली आणि त्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळालेला दिसून आला आहे. साऊथच्या त्या चित्रपटानं बॉलीवूडच्या (Bollywood Latest News) प्रेक्षकांना, चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. नवव्या दिवसांपर्यत या चित्रपटानं आतापर्यत १५५.७ कोटी रुपयांची कमाई करुन वेगळा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर बॉलीवूडच्या चित्रपटांचा दबदबा असल्याचे दिसून आले होते. मात्र साऊथच्या तेलुगू भाषेतील हनुमानची इंट्री झाली आणि वेगळेच चित्र पाहायला मिळाले. या चित्रपटानं (HanuMan Box Office Collection) चाहत्यांना जिंकून घेतले आहे. त्याच्या कमाईचे आकडे सर्व काही सांगून जाणारे आहेत.

हनुमानच्या कमाईविषयी सांगायचे झाल्यास या चित्रपटानं पहिल्या शनिवारी १२.४५ कोटींची कमाई केली होती. त्यानंतर त्याचे ग्रॉस कलेक्शन हे ११५.७ कोटींच्या घरात गेले. सध्याच्या घडाली हा चित्रपट १५५.७ कोटींची कमाई केली आहे. प्रसंथ वर्मानं या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून त्यात तेजा सज्जानं प्रमुख भूमिका साकारली आहे.

दुसऱ्या शुक्रवारी हनुमाननं १०.०५ कोटींची कमाई केली होती. पहिल्या आठवड्यातील हनुमानचे कलेक्शन ९९.८५ कोटींचे असल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी भारतीय चित्रपटांमध्ये हॉलीवूडच्या धर्तीवर अनेक सुपरहिरो धाटणीचे चित्रपट आले होते. मात्र सर्वाधिक कमाई करण्यात हनुमाननं बाजी मारली आहे.

हनुमाननं पहिल्याच दिवशी ८ कोटींची कमाई करुन येत्या काळात बॉक्स ऑफिसवर आपलेच राज्य असणार याचे भाकित केले होते. सोशल मीडियावर देखील हनुमान चित्रपटावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. चित्रपटातील ग्राफीक्स, साऊंड, अॅक्शन सीन यावर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

तेलुगू चित्रपटातील पहिला सुपरहिरो असणाऱ्या हनुमाननं चालु आठवड्यातील शनिवारी आणि रविवारी १२.४५ आणि १६ कोटींची कमाई केल्याचे दिसून आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार येत्या काळात हा चित्रपट मोठी कमाई करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT