Hanuman Movie makers complaint against theater owners, what is the real case?  SAKAL
मनोरंजन

Hanuman Movie: 'हनुमान'च्या निर्मात्यांची थिएटर मालकांविरोधात तक्रार, नेमकं प्रकरण काय?

'हनुमान' सिनेमाच्या निर्मात्यांनी थिएटर मालकांविरोधात तक्रार केली आहे.

Devendra Jadhav

Hanuman Movie News: प्रशांत वर्मा दिग्दर्शित 'हनुमान' हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटात तेजा सज्जा, वरलक्ष्मी सरथकुमार आणि अमृता अय्यर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

'हनुमान' बॉक्स ऑफिसवरही चांगली कामगिरी करत आहे. मात्र वितरक आणि निर्मात्याने तेलुगू फिल्म प्रोड्युसर कौन्सिलकडे (TFPC) तक्रार दाखल केली आहे. काय आहे नेमकं प्रकरण?

हनुमानच्या निर्मात्या-वितरकाने तक्रार केली

TFPC (Tamil Film Producer Council) ने प्रेसला जारी केलेल्या निवेदनात, त्यांनी लिहिले की, Mythri Movies Distributors LLP (वितरक) नी 12 जानेवारी रोजी रिलीज होणारा 'हनुमान' चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी तेलंगणातील काही चित्रपटगृहांशी करार केला आहे.

तरीही काही चित्रपटगृहांनी या कराराचे पालन केले नाही आणि हनुमान चित्रपट रिलीज केला नाही. यामुळे संतप्त होऊन वितरक आणि निर्माते निरंजन रेड्डी यांनी टीएफपीसीकडे तक्रार दाखल केली आहे.

TFPC चा फटकार

TFPC ने लिहिले की अशा कृतींमुळे तेलुगू चित्रपट उद्योगाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. त्यांनी केलेल्या निवेदनानुसार, "तेलुगू चित्रपट निर्माते परिषद (TFPC) थिएटर्स आणि त्यांच्या अनैतिक पद्धतींचा तीव्र निषेध करते. विश्वास, नैतिकता आणि न्यायाच्या आधारावर चालणाऱ्या संपूर्ण तेलुगू चित्रपट उद्योगावर अशा पावलांचा परिणाम होतो. ज्या थिएटर्स मालकांनी या कराराविरोधात काम केले आहे. त्यांनी ताबडतोब त्यांच्या कराराचा सन्मान करून हनुमान चित्रपटाला न्याय देण्याची गरज आहे."

हनुमानची कमाई

दिग्दर्शक प्रशांत वर्मा यांचा 'हनुमान' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने शानदार ओपनिंग घेतली आहे. याला समीक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून, प्रेक्षकांनाही हा चित्रपट आवडला आहे.

चित्रपटगृहांमध्ये ‘जय श्री राम’ आणि ‘जय बोलो हनुमान की’ अशा घोषणा दिल्या जात आहेत. अभिनेता तेजा सज्जाच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी 7.56 कोटींची कमाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT