hanuman movie trailer starring teja sajja Prasanth Varma released 12 jan 2024  SAKAL
मनोरंजन

Hanuman Trailer: आधुनिक कथेला पौराणिकतेची जोड! 'हनुमान'चा अनोखा ट्रेलर पाहिला का?

बहुप्रतिक्षित 'हनुमान' सिनेमाचा ट्रेलर भेटीला आलाय

Devendra Jadhav

Hanuman Trailer News: गेल्या काही दिवसांपासुन मनोरंजन क्षेत्रात नवनवीन विषयांवरचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अ‍ॅनिमल, सालार, डंकी या तीन सिनेमांची सध्या चांगलीच चर्चा आहे. अशातच एका नवीन सिनेमाचा आगळावेगळा ट्रेलर भेटीला आलाय. त्या सिनेमाचं नाव आहे 'हनुमान'.

'हनुमान' सिनेमाचा ट्रेलर आज भेटीला आलाय. ट्रेलर भेटीला येताच तो ट्विटरवर ट्रेंड झाला असून लोकांच्या पसंतीस उतरला आहे.

हनुमान सिनेमाचा ट्रेलर भेटीला

'हनुमान' सिनेमाचा ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं की, एका हिरव्यागार निसर्गरम्य परिसरात बजरंगबलीचा भव्यदिव्य पुतळा दिसतो. त्याच गावात एक तरुण चित्त्याच्या वेगाने जंगलात धावत असलेला दिसतो.

दुसरीकडे एका अज्ञात ठिकाणी एक दृष्ट प्रवृत्तीचा खलनायक सामान्य माणसांना त्रास देत असतो. पुढे मग बजरंगबलीचा आशिर्वाद घेऊन अद्भुत शक्तींच्या जोरावर गावातील तो तरुण गुंडाचा कसा सामना करतो, याची रंजक कहाणी ट्रेलरमध्ये बघायला मिळते.

हनुमान सिनेमाची स्टारकास्ट

‘हनुमान’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत वर्मा यांनी केले असून, नव्याने सिनेविश्व निर्माण करण्याच्या तयारीत आहेत. हा चित्रपट एका भारतीय सुपरहिरोच्या व्यक्तिरेखेवर आधारित आहे, ज्यामध्ये अभिनेता तेजा सज्जा मुख्य भूमिकेत आहे.

याशिवाय विनय राय, अमृता अय्यर, वरलक्ष्मी सरथ कुमार, राज दीपक शेट्टी आणि वेनेला किशोर असे अनेक कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

या तारखेला हनुमान येणार प्रेक्षकांच्या भेटीला

'हनुमान' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाचा ट्रेलर आणि त्यात वापरण्यात येणारे ग्राफिक्स अप्रतिम दिसत आहेत.

त्याचबरोबर पार्श्वभूमीतील संस्कृत श्लोकाने हा ट्रेलर आणखी सुंदर झाला आहे. या चित्रपटाचा टीझर गेल्या वर्षी नोव्हेंबर २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून सर्वांच्या नजरा या चित्रपटाच्या ट्रेलरकडे लागल्या होत्या. हा सिनेमा नवीन वर्षात १२ जानेवारी २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : बळकावलेल्या जमिनींपासून बंदूकीच्या गोळ्यांपर्यंत! पुणे पोलिसांनी निलेश घायवळभोवती आवळला फास, घरावर छापेमारी, हाती लागलं मोठं घबाड

Coldrif Syrup : मध्य प्रदेश-राजस्थानमध्ये मृत्यूंनंतर 'कोल्ड्रिफ सिरप'वर महाराष्ट्रात बंदी

Latest Marathi News Live Update : पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज; उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता

Petrol Explosion: पेट्रोलच्या भडक्यात भाजलेल्या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू

Sharad Pawar : शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली चुकीची, शरद पवार यांचे मत; सरकारने निर्णयाचा फेरविचार करावा

SCROLL FOR NEXT