kumar sanu's 61 st birthday  
मनोरंजन

#HappyBirthday : कुमार सानू यांची 'ही' गाणी आजही 'सुपरहिट'

वृत्तसंस्था

मुंबई : आपल्या आवाजाने संगीत क्षेत्रात प्रसिद्धी पावलेले अनेक गायक पाहायला मिळतात. पण त्यापैकी काही मोजकेच गायक असे आहेत, ज्यांनी वर्षानुवर्षे आवाजाची जादू कायम ठेवली आहे. बॉलिवूडमधल्या काही दिग्गज गायकांमध्ये आवर्जून एक नाव घेतलं जातं ते कुमार सानू यांचं. उदित नारायण, अभिजीत भट्टाचार्य हे दमदार गायक असतानादेखील 90 च्या दशकामध्ये सर्वाधिक पसंती मिळालेला आवाज म्हणजे कुमार सानू. आज कुमार सानू यांचा 61 वा वाढदिवस आहे. 

कुमार सानू यांनी 1986 मध्ये त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. एकापेक्षा एक सरस गाणी त्यांनी बॉलिवूडला दिली. त्यांचा जन्म 23 सप्टेंबर 1957 मध्ये कोलकत्यात झाला. त्यांचे वडील पशुपती भट्टाचार्यही गायक आणि संगीतकार होते. कुमार सानू यांच खरे नाव आहे केदारनाथ भट्टाचार्य. इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करण्याआधी त्यांनी हे नाव कुमार सानू असं केलं. 'हिरो हिरालाल' या चित्रपटाने प्रसिद्ध गायक म्हणून त्यांना ओळख दिली.  

ज्यावेळी कुमार सानू यांनी इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री केली, तेव्हा किशोर कुमार यांच वर्चस्व होतं. मात्र, त्यांच्या निधनाने संगीत जगतात पोकळी निर्माण झाली. त्यावेळी कुमार सानू यांनी ती पोकळी भरूण काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या आवाजाला लोकांनी चांगला प्रतिसादही दिला. कुमार सानू आणि अलका याग्निक यांचं 'मेरा दिल भी कितना पागल है' हे सुपरहिट गाणं आजही रसिकांच्या मनावर आपली मोहिनी घालून राहिले आहे.

मेलडी किंग कुमार सानू यांनी गायलेली सुपरहिट गाणी :

1. मेरा दिल भी कितना पागल है

2. दिल है के मानता नही

3. दो दिल मिल रहे है

4. धीरे धीरे से मेरी जिंदगी मे आना

5. इक लडकी को देखा तो ऐसा लगा

6. ये काली काली आँखे

गायक म्हणून कुमार सानूंनी इंडस्ट्रीमध्ये जवळपास 30 वर्षांचा कालावधी पूर्ण केला आहे. 'दिल है कि मानता नहीं', 'दो दिल मिल रहें है', 'ये काली-काली आंखें', 'धीरे धीरे से मेरी जिंदगी मे आना' आणि 'इक लडकी को देखा तो ऐसा लगा' ही काही त्यांची सुपरहिट गाणी आहेत. एवढचं काय तर त्यांनी गायलेल्या 'दर्द करारा' या लोकप्रिय गाण्याची जादू अजूनही कायम आहे. आयुषमान खुरानाच्या 'दम लगाके हाऐशा' या चित्रटामध्ये कुमार सानू यांनी 'दर्द करारा' हे गाणं गात बऱ्याच काळानंतर इंडस्ट्रीत एन्ट्री केली. 

7. दर्द करारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff : मुंबई इंडियन्स स्पर्धेबाहेर! शेवटच्या षटकात थरार अन् RCBचा रोमहर्षक विजय; POINT TABLE मध्ये अव्वल स्थानी झेप

PM मोदींमुळे भारतात तेल-गॅस मिळतोय, आवश्यकतेनुसार वापराचं आवाहन योग्यच; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

RCB vs MI Live: तिलक वर्माची विकेट अन् रोहित शर्मा संतापला; मुंबई इंडियन्स कसेबसे सन्मानजनक धावांपर्यंत पोहोचले Video Viral

Pune Crime: पुण्यात मोठी कारवाई; ‘एमडी’ ड्रग्ज कारखाना उघडण्याचा कट उधळला, सव्वा कोटींच्या मुद्देमालासह आठ जणांना अटक!

संकटाचा काळ! वर्षभर परदेशगमन, सोनं खरेदी करू नका; खाद्यतेलही कमी खा, मोदींनी असं आवाहन का केलं?

SCROLL FOR NEXT