anupam kher family
anupam kher family  Team esakal
मनोरंजन

'सारं जग तुझ्यावर प्रेम करतं, तू लवकर बरी होशील'

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडचे प्रसिध्द अभिनेते अनुपम खेर (bollywood actor anupam kher) यांच्या पत्नी आणि प्रख्यात अभिनेत्री किरण खेर (kirron kher) या गेल्या दिवसांपासून कॅन्सरच्या आजारानं त्रस्त आहेत. याची माहिती अनुपम यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी दिली होती. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आज किरण खेर यांचा जन्मदिन आहे. त्यानिमित्तानं अनुपम यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. चाहत्यांचा त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. किरण खेर यांना कॅन्सरचे निदान होताच चाहत्यांना धक्का बसला होता. (happy birthday of kirron kher anupam kher write a special note for her)

आता अनुपम यांनी त्यांच्या जन्मदिनाच्या (happy birthday) औचित्यानं पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी या दुर्धर आजारातून लवकर बरं व्हावं अशी प्रार्थना देवाकडे केली आहे. चाहत्यांनाही त्यांनी किरण खेर यांच्यासाठी प्रार्थना करावी, असे आवाहन केले आहे. किरण खेर या त्यांचा 69 वा जन्मदिन साजरा करत आहेत. यावेळी अनुपम यांनी किरण खेर यांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याला चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट दिल्या आहेत.

kher family

अनुपम यांनी शेअर केलेल्या त्या फोटोंमध्ये किरण खेर त्यांच्या परिवारासमवेत दिसत आहेत. त्या फोटोला कॅप्शन देताना अनुपम यांनी लिहिले आहे, देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो, सुदृढ आरोग्य देवो, सा-या जगभरातून तुम्हाला चाहत्यांचे प्रेम मिळत आहे. त्याचा आपण स्वीकार करावा. तुम्ही लवकरच या आजारातून बाहेर पडाल. तुम्ही स्पष्टवक्ते आहात, प्रामाणिक आहात, आतापर्यत तुम्ही मोठ्या संकटांना सामोरं जाऊन मोठं यश मिळवलं आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनुपम आणि किरण यांची भेट 1974 मध्ये डिपार्टमेंट ऑफ इंडियन थिएटरमध्ये झाली होती. त्यानंतर काही काळ दोघांमध्ये दुरावा होता. त्यानंतर ते 1985 मध्ये पुन्हा एकत्र आले. किरण यांचा पहिल्या पतीपासून घटस्फोट झाला आणि त्यांनी अनुपम यांच्याशी लग्न केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT