Diwali 2023 Esakal
मनोरंजन

Diwali 2023: लक्ष दीप हे उजळले घरी! बॉलिवूड कलाकारांनी अशी साजरी केली दिवाळी!

Vaishali Patil

Celebs Diwali Celebration Photos: देशभरात सध्या दिवाळी सण साजरा केला जात आहे. सर्वसामान्यांपासून ते बॉलीवूड सेलिब्रिटीपर्यंत हा सण मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत. बी टाऊन सेलेब्सनीही हा सण कुटुंबियांसोबत मोठ्या थाटामाटात साजरा केला.

दरम्यान, बॉलीवूडचे लोकप्रिय जोडपे दीपिका-रणवीर आणि आलिया-रणबीर, कियारा- सिद्धार्थ यासोबतच करण, प्रियंका आणि शिल्पा शेट्टी यांनी दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो सोशल मिडियावर शेयर केले आहेत. कलाकारांनी साजरी केलेली दिवाळी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.

करीना कपूर खान आणि सैफ अली खानच्या घरी देखील दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तिने दिवाळीनिमित्त तिच्या कुटुंबासोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

या फोटोत जेह आणि तैमूर आई बाबाला त्रास देताना दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये करिना लिहिते की, 'वर्षांमागून वर्ष उलटले मात्र आम्ही अजूनही पूर्ण फॅमिली फोटोसाठी प्रयत्न करत आहोत. दिवाळीच्या शुभेच्छा...'

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी देखील लग्नानंतरची पाचवी दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली. ज्याचे फोटो दीपिका पदुकोणने तिच्या इंस्टा वर शेअर केले आहेत.

या फोटोत दीपिका आणि रणवीर दिवाळीची पूजा आणि रोमँटिक पोज देताना दिसत आहेत. दिवाळीसाठी दीपिकाने लाल रंगाचा ड्रेस तर रणवीरने कुर्ता घातला होता. 'दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा' म्हणत दीपिकाने हे फोटो शेयर केले आहेत.

खान कुटूंबाप्रमाणेच कपूर कुटुंबीयांनी देखील दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट देखील पारंपरिक लूकमध्ये दिसले.

आलियाने दोन फोटो शेयर केले आहेत.याशिवाय आलियाने चाहत्यांना तिची मुलगी राहा हिच्या दिवाळी आउटफिटची झलकही सोशल मिडियावर शेयर केली आहे.

तर दुसरीकडे करण जोहरने आपल्या दोन मुलांसोबत दिवाळीची खास पूजा केली. करणने त्याच्या इंस्टाग्रामवर या पूजेचे काही फोटोही पोस्ट करत सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात.

विकी कौशल आणि कतरिना कैफने देखील दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. लक्ष्मीपूजनासाठी दोन्ही स्टार्सचे कुटुंबीय त्यांच्या घरी जमले होते. यावेळी विकी आणि कतरिना कैफ पारंपारिक पोशाखात दिसत आहेत.

परदेशात असलेल्या प्रियांका चोप्रानं देखील खास पद्धतीने दिवाळी साजरी केली. या दिवाळीत तिची मुलगी मालती हिने पहिली रांगोळी काढली होती. ज्याचे फोटो तिने सोशल मिडियावर शेयर केले होते.

शिल्पा शेट्टीने सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेयर केला ज्यात ती मुलीसोबत सुंदर रांगोळी काढताना दिसली. या व्हिडिओसह तिने सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तर दुसरीकडे श्रद्धा कपूरनेही दिवे लावून दिवाळी साजरी केली आहे. शाहिद कपूरनेही चाहत्यांना खास दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

क्रिती सेनननेही आपल्या पुर्ण परिवारासोबत दिवाळी साजरी केली ज्याचे फोटो तिने सोशल मिडियावर शेयर केले आहेत. मलायका अरोरानेही इन्स्टाग्रामवर तिचा फॅमिली फोटो पोस्ट करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या बॉलिवूड सेलिब्रिटींचे हे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akshaya Tritiya Gold 2026: सोनं वाढेल की घसरेल? ‘भाव पडल्यावर खरेदी’चा मोतीलाल ओसवालचा सल्ला

Iran-Us War: आता काय बिनसलं? होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद; कारण सांगत इराणचा कठोर निर्णय

रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात झळकणार गायक अतुल गोगावलेचा लेक, गाण्यात दिसली झलक

RCB vs DC: फॉर्ममध्ये असलेल्या बंगळुरूविरुद्ध अक्षर पटेलने जिंकला टॉस! बर्थडे बॉय केएल राहुलकडे असणार लक्ष; पाहा Playing XI

MPSC Success : दगड फोडणाऱ्याची मुलगी झाली अधिकारी! लोणीच्या मोहिनीची महसूल सहाय्यकपदावर झेप; तिचा संघर्ष वाचून डोळ्यात येईल पाणी

SCROLL FOR NEXT