Happy Family Trailer  esakal
मनोरंजन

Happy Family Trailer : 'जब मैं जवान थी तो फुल्ल बॉम्ब थी!' 'हॅप्पी फॅमिली' चा फुल्ल टू राडा!

टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये आणखी एका मालिकेनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. कोरोनाच्या काळात ओटीटीनं प्रेक्षकांना मोठा दिलासा होता.

सकाळ डिजिटल टीम

Happy Family Condition Apply Official Trailer : टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये आणखी एका मालिकेनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. कोरोनाच्या काळात ओटीटीनं प्रेक्षकांना मोठा दिलासा होता. दरम्यानच्या काळात ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या नव्या मालिकांनी प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले होते. सध्या सोशल मीडियावर एका मालिकेची जोरदार चर्चा रंगली आहे.

अमेझॉन प्राइम व्हिडिओनं आपल्या फॅमिली कॉमेडी सिरीज 'हॅप्पी फॅमिली: कंडीशंस अप्लाय'चा रोमांचक ट्रेलर रिलीज केला आहे. प्रीमियरची घोषणा केली आहे. या सिरीजमध्ये राज बब्बर, रत्ना पाठक शाह, अतुल कुलकर्णी, आयेशा जुल्कासह रौनक कामदार, मीनल साहू, सनाह कपूर आणि अहान साबू या कलाकारांना पाहायला मिळणार आहे.

Also Read - तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

आतिश कपाडिया आणि जेडी मजेठियाद्वारा निर्मित आणि दिग्दर्शित तसेच हॅट्स ऑफ प्रॉडक्शनच्या बॅनरखाली निर्मित असलेली, 'हॅप्पी फॅमिली: कंडीशंस अप्लाय'ही एक एपिसोडिक रिलीज होणार आहे. पहिले चार भाग 10 मार्च रोजी प्राइम व्हिडिओवर प्रीमियर होणार आहे. सीरीजचा हा ट्रेलर ढोलकियांच्या दुनियेत घेऊन जातो, जिथे एकाच घरात रहात असलेल्या ढोलकिया कुटुंबाच्या चार पिढ्यांना जीवनातील चढ-उतारांना एकत्र सामोरे जाताना पाहायला मिळणार आहे.

तसेच, जगासाठी भलेही ढोलकिया एक पिक्चर-परफेक्ट परिवार आहे परंतु इतर कोणत्याही कुटुंबाप्रमाणेच अकार्यक्षम असून, प्रत्येकाची स्वत:ची खास शैली, सूर आणि बोली आहे.

आतिष कपाडियाद्वारा लिखित 'हॅप्पी फॅमिली: कंडीशंस अप्लाय'या सिरीजमध्ये स्वाती दास, अतुल कुमार, करियुकी मार्गरेट वांजीकू, परेश गनात्रा, प्रणोती प्रधान, समर वर्मन्नी आणि नेहा जुल्का यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISRO: 'इस्रो'कडून होतेय ४० मजली उंचीच्या यानाची निर्मिती; अध्यक्ष व्ही. नारायण यांनी दिली सखोल माहिती

Georai Crime : 'त्या' मायलेकीच्या मृत्यूचे कारण आले समोर; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल, पतीला अटक

Maharashtra Heavy Rain Update : मुसळधार पावसाचा फटका! जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, शाळा- कॉलेज बंद, पण कुठे?

Mumbai Rain Update: मुंबईकरांनो सतर्क राहा! पावसाचा जोर वाढणार, आयएमडीचा अंदाज

Sangli News : कोयनेत १०० टीएमसी; कृष्णा ४० फुटांवर जाणार, नदीकाठ चिंतातूर

SCROLL FOR NEXT