HappyBirthdayAmitabhBachchan A special teaser of this movie for Amitabh Bachhan
HappyBirthdayAmitabhBachchan A special teaser of this movie for Amitabh Bachhan 
मनोरंजन

#HappyBirthdayAmitabhBachchan : बिग बींसाठी 'या' सिनेमाचा खास टीझर

सकाळवृत्तसेवा

बॉलिवूड महानायक अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या 76 व्या वाढदिवसानिमित्त त्यांना एक खास भेट त्यांना देण्यात आली आहे. सध्या सोशल मिडीयावरुन बिग बी यांच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यांपैकीच एक खास शुभेच्छा आली आहे ती म्हणजे 'स्ये रा नरसिम्हा रेड्डी' या सिनेमाकडून.

अमिताभ बच्चन लवकरच तेलगू सिनेमात दिसणार आहेत. 'स्ये रा नरसिम्हा रेड्डी' असे सिनेमाचे नाव आहे. सिनेमाचा टीझर युट्यूबवर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सिनेमातील अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेचा फर्स्ट लूक या टीझरमधून दिसतो. या भूमिकेत त्यांचे केस आणि दाढी वाढलेली आणि कपाळावर कुंकवाचा टिळा लावलेला दिसून येत आहे. टीझरमधून 'हॅपी बर्थडे अमित जी' अशा शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत.
 

स्वातंत्र्यसैनिक उय्यालवाडा नरसिम्हा रेड्डी यांच्या जीवनावर हा सिनेमा आधारित आहे. यात नयनतारा, विजय सेतुपती, तमन्ना आणि सुदीप यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. 'स्ये रा नरसिम्हा रेड्डी' सिनेमाची निर्मिती मेगास्टार चिरंजीवी यांचा मुलगा रामचरण यांनी केली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT