Har Har Mahadev movie news esakal
मनोरंजन

Har Har Mahadev: जितेंद्र आव्हाडांना दिग्दर्शकांचं जशास तसं उत्तर, 'मग आम्हाला...'

हर हर महादेव या चित्रपटावरुन सध्या मोठ्या प्रमाणावर वाद सुरु झाला आहे. या चित्रपटाचे शो बंद पाडले जात आहे,

सकाळ डिजिटल टीम

Har Har Mahadev marathi movie director: हर हर महादेव या चित्रपटावरुन सध्या मोठ्या प्रमाणावर वाद सुरु झाला आहे. या चित्रपटाचे शो बंद पाडले जात आहे, यासगळ्या प्रकरणावर या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन वेगवेगळ्या गोष्टींवर प्रतिक्रिया दिली आहे.

देशपांडे म्हणाले, काल जो प्रकार घडला तो लाच्छंनास्पद आहे. मी या प्रकरणाचा निषेध करतो. आपण जर स्वताला शिवरायांचे भक्त म्हणवतो तर आपण त्यांनी दिलेल्या शिकवणूकीनुसार वागले आहे. जे आक्षेप घेत आहेत त्या गोष्टींवरुन ऐतिहासिक पुरावे आम्ही सेन्सॉर बोर्डाला दिले आहेत. त्यांना दाखवले आहे. त्या सगळ्या गोष्टींवर पुरावे दिले आहेत. कागदपत्रं दिली आहेत. म्हणून तर त्यांनी सर्टिफिकेट दिले आहे.

हेही वाचा: कर्ज परतफेडीच्या नियोजनाचे पाच मार्ग...

जे बोललं जातंय ते चुकीचे आहे. आम्हाला देखील सेन्सॉर बोर्डानं काही गोष्टी विचारले गेले. आपण जेव्हा बखरींचा अभ्यास करतो तेव्हा अनेक गोष्टी समोर येतात. १९०५ मध्ये केळुस्करांच्या एका पुस्तकामध्ये काही गोष्टींचा उल्लेख केला आहे. याचा संदर्भ अभिजित देशपांडे यांनी केला. असेच पुरावे आम्ही दिले आहे.

शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीच्या लोकांना एकत्र आणले होते. माणुसकीचा संदेश दिला होता. तेव्हा त्यांचे विचार बाजुला राहिले आणि आता त्यावरुन राजकारण केले जात आहे. जो प्रकार सध्या होतो आहे त्यावरुन वाईट वाटते. तुम्ही खरचं चित्रपट पहा. पण या चित्रपटामध्ये आक्षेप घेण्यासारखे नाही. असेही देशपांडे यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : वेतनवाढीपूर्वीच कर्मचाऱ्यांना मोठा धक्का ! 'या' मुद्द्यावर सरकारने दिला स्पष्ट नकार

Success Story: श्वेता पवार खेळाडू कोट्यातून राज्यात प्रथम; पोलिस उपनिरीक्षकपदी निवड, संघर्षातून एमपीएससीमधील तिसरे यश!

Latest Marathi News Live Update : कोल्हापूरमध्ये बनावट नोटा जप्त, दोघांना अटक

बंगालमध्ये भाजपचा 'खेला'; ममतांचा पराभव करण्यासाठी काढला हुकुमाचा एक्का, कोण आहेत सुवेंदू अधिकारी?

Whatsapp Guest Chats : आता अकाऊंट नसताना चालणार WhatsApp! नंबर सेव्हपासून अन् ॲप डाउनलोड करण्यापर्यंतच टेन्शन संपणार, जाणून घ्या कसं?

SCROLL FOR NEXT