Har Har Mahadevd Movie esakal
मनोरंजन

Har Har Mahadev: 'हर हर महादेववर काहीही बोलू नका', राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश

दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांचा बहुचर्चित हर हर महादेव या चित्रपटावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Har Har Mahadev Marathi movie: दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांचा बहुचर्चित हर हर महादेव या चित्रपटावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. काल पुणे आणि मुंबईतील काही थिएटरमध्ये हा चित्रपटाचे शो बंद पाडण्यात आले. चित्रपट आणि त्याच्यावरुन सुरु झालेला वाद यावरुन आता राजकीय वाद सुरु झाला आहे. यासगळ्यात मनसे आणि राष्ट्रवादी कॉग्रेस यांच्यात लढा सुरु झाला होता.

अखेर त्या वादावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मोठा आदेश दिला आहे. त्यांनी हर हर महादेव या चित्रपटाबाबत कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न देण्याचे आदेश दिले आहेत. ठाकरेंनी आपल्या सर्व प्रवक्त्यांना या चित्रपटाबाबत काहीही बोलू नका. असे सांगितले आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन हर हर महादेव या चित्रपटाबाबत भाष्य केले होते. त्यामध्ये ऐतिहासिक घडामोडींवरुन वाद निर्माण झाला होता. हर हर महादेवमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचा आरोप संभाजीराजेंनी केला होता. राष्ट्रवादी कॉग्रेसनं संभाजीराजेंच्या भूमिकेला पाठींबा दिला होता. यासगळ्यात मनसे आणि राष्ट्रवादी कॉग्रेस यांच्यात वाद सुरु झाला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी मुंबईतील एका थिटएरमधून प्रेक्षकांना बाहेर काढले. त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही होत आहे.

यासगळ्यात मनसे आणि राष्ट्रवादी यांच्यात वाद सुरु झाला होता. तो वाद आणखी वाढू नये यासाठी मनसेकडून पदाधिकाऱ्यांना काही सुचना देण्यात आल्या आहेत. यापुढील काळात केवळ चित्रपटाचे दिग्दर्शकच बोलतील. बाकी कुणी नाही. असे राज यांनी सांगितल्याचे कळते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT