Hardeek Joshi - Akshaya Deodhar Jai Malhar Jejuri video viral must watch SAKAL
मनोरंजन

Hardeek Joshi - Akshaya Deodhar: जय मल्हार म्हणत हार्दिकने अक्षयाला उचलले, जेजुरीतला व्हिडीओ पहाच

अशातच हार्दिक - अक्षयाचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. यात हार्दिक - अक्षया जेजुरीला गेले आहेत

Devendra Jadhav

Hardeek Joshi - Akshaya Deodhar Jejuri Video News: ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून हार्दिक आणि अक्षया घराघरात पोहोचले. राणादा-पाठकबाईंची ऑन स्क्रीन जोडी प्रेक्षकांच्या फारच पसंतीस उतरली होती. ते खऱ्या आयुष्यातही विवाहबद्ध झाल्याने चाहतेही खूश आहेत.

लग्नानंतर हार्दिक - अक्षयाची विविध ठिकाणी भटकंती सुरु आहे. अशातच हार्दिक - अक्षया विविध मंदिरात देवदर्शनाला जात आहेत. अशातच हार्दिक - अक्षयाचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. यात हार्दिक - अक्षया जेजुरीला गेले आहेत.

(Hardeek Joshi - Akshaya Deodhar Jai Malhar Jejuri video viral must watch )

हार्दिक - अक्षया जेजुरीला

असं दिसतंय की, लग्नानंतर हार्दिक - अक्षया पहिल्यांदाच जेजुरीला गेल्याचं दिसतंय. या व्हिडीओत सुरुवातीला जेजुरी गड दिसतो.

पुढे गडाच्या पायऱ्यांवर हार्दिकने दोन हातांनी अक्षयाला उचललं. आणि तो गडाच्या पायऱ्यांवर चालत राहीला.

पुढे हार्दिक - अक्षया देवाची पुजा करताना आणि अभिषेक करताना दिसले. दोघांनी मनोभावे मल्हारीची प्रार्थना केली. पुढे हार्दिकने मल्हारीची तलवार उचलली. हार्दिक - अक्षयाला पहायला त्यांच्या फॅन्सनी गर्दी केलेली दिसली.

हार्दिक - अक्षयाचं लग्न

'तुझ्यात जीव रंगला'फेम राणादा आणि पाठक बाई म्हणजेच मराठीतील प्रसिद्ध कलाकार हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच्या लग्नाची उत्सुकता सर्वांना लागली होती.

पुढे हार्दिक आणि अक्षयाने २ डिसेंबर २०२२ ला लग्न केले. पुण्यामध्ये त्यांचा शाही विवाह सोहळा रंगला

हार्दिक आणि अक्षयाचं वर्कफ्रंट

तुझ्यात जीव रंगला मालिकेतील राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अन्य मराठी कलाकारांनी काही दिवसांपुर्वी एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला.

मराठी कलाकारांचा शिवसेना पक्षात प्रवेश होणं ही सर्वांसाठी आश्चर्यकारक गोष्ट होती. अशातच राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशीने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश का केला याचं कारण सांगीतलंय.

त्याच्यासोबत त्याची बायको म्हणजेच अक्षया देवधरने सुद्धा शिवसेनेत प्रवेश केला. हार्दिक लवकरच महेश मांजरेकर दिग्दर्शित वेडात मराठे वीर दौडले सात या सिनेमात झळकणार आहे. अक्षया सध्या कोणत्याही नवीन प्रोजेक्टमध्ये काम करत नाहीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Uninon Kolhapur News : ‘गोकुळ’ उभारण्यासाठी आनंदराव पाटील चुयेकरांनी घरातील सोनेही गहाण ठेवलं; शशिकांत चुयेकर भावुक

Samruddhi Sugar Factory: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा! समृद्धी कारखाना देणार प्रतिटन ३०० रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान

Viral Story : ९५ हजार पगाराची नोकरी गेली, घरच्यांचं वागणंच बदललं; म्हणाले- तुला जन्म देऊन चूक झाली, २२ वर्षीय तरुणाने पोस्टद्वारे मांडली व्यथा

Dairy Farmers: दूध उत्पादकांचे अर्थकारण कोलमडले; पशुखाद्याच्या दरात चार महिन्यांत २५ ते ३५ टक्के वाढ, दुधाच्या दराचा ताळमेळ बसेना

Maharashtra Live News : पंतप्रधान मोदींनी चेन्नईमध्ये विकासकामांची पायाभरणी केली

SCROLL FOR NEXT