hardeek joshi and bhau kadam upcoming marathi movie club 52 SAKAL
मनोरंजन

Bhau Kadam: भाऊ कदम - हार्दिक जोशीच्या 'क्लब 52' चित्रपटाचा धडाकेबाज ट्रेलर एकदा बघाच!

भाऊ कदम - हार्दिक जोशीचा क्लब 52 सिनेमाचा ट्रेलर भेटीला

Devendra Jadhav

Bhau Kadam - Hardeek Joshi Club 52 Trailer: यावर्षी मराठी मनोरंजन विश्वात अनेक वेगवेगळ्या धाटणीच्या सिनेमांनी थिएटरमध्ये प्रेक्षकांची गर्दी होण्यात यश मिळवलं. वाळवी, बाईपण भारी देवा, आत्मपॅफ्लेट असे अनेक वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे लोकांच्या पसंतीस उतरले.

नुकताच रिलीज झालेला झिम्मा 2 सिनेमा सुद्धा सुपरहिट झालाय. अशातच एक नवीन मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय तो म्हणजे 'क्लब 52'. भाऊ कदम - हार्दिक जोशी यांची प्रमुख भूमिका सिनेमात पाहायला मिळतेय. कसा आहे सिनेमाचा ट्रेलर जाणून घ्या.

(hardeek joshi and bhau kadam upcoming marathi movie club 52)

भाऊ कदम - हार्दिक जोशी यांच्या 'क्लब 52' सिनेमा

"क्लब 52" या चित्रपटाची एक डाव नियतीचा अशी टॅगलाईन आहे. कसिनो आणि त्याच्याशी संबंधित कथानक असल्याचं ट्रेलरवरून दिसून येतं. चित्रपटात अॅक्शनची भरमार आहे, शिवाय संवादही खटकेबाज आहेत.

काही नवोदित कलाकार असूनही त्यांचा अभिनय उत्तम झाल्याचा दिसतो आहे. चित्रपटाचं पोस्टर आणि टीजरमुळे या चित्रपटानं आधीच उत्सुकता निर्माण केली आहे. त्यामुळे चित्रपटाच्या ट्रेलरने लोकांच्या मनात आणखी उत्सुकता चाळवली गेलीय.

"क्लब 52" सिनेमाची स्टारकास्ट

बजरंग बादशाह यांच्या कथेवर राकेश शिर्के यांनी क्लब 52 ची पटकथा आणि संवादलेखन केले आहे. कौशल गोस्वामी यांनी छायांकन, करण आणि दर्शन यांनी संगीत, अजय वाघमारे, बजरंग बादशाह, सुजाता पवार यांनी गीतलेखन, आदित्य बेडेकर यांनी पार्श्वसंगीताची जबाबदारी निभावली आहे.

चित्रपटात हार्दिक जोशी, भाऊ कदम, शशांक शेंडे, भरत ठाकूर, यशश्री व्यंकटेश , टीना सोनी, राधा सागर, नितीन रुपनवार, उमेश बोलके अशी तगडी स्टारकास्ट आहे.

क्लब 52 सिनेमाची रिलीज डेट

अभिनेता हार्दिक जोशीची अॅक्शनपॅक्ड भूमिका असलेल्या "क्लब 52" या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. भाऊ कदम यांची विनोदी भूमिका पाहायला मिळतेय. नाथ प्रॉडक्शन्स प्रस्तुत "क्लब 52" या चित्रपटाची निर्मिती वैशाली ठाकूर यांनी केली आहे. अमित वाल्मिक कोळी दिग्दर्शित या चित्रपटात दमदार स्टारकास्ट आणि मनोरंजक कथानक असून हा चित्रपट १५ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

'प्रेमाची गोष्ट'च्या पाठोपाठ छोट्या पडद्यावरील आणखी एक मालिका घेणार निरोप; कलाकारांनी शेअर केली भावुक पोस्ट

High BP Causes: 'या' 3 दैनंदिन सवयी बनतात उच्च रक्तदाबाचं मुख्य कारण! आजच बदल करा

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

SCROLL FOR NEXT