hardeek joshi bhau kadam new marathi movie club 52 SAKAL
मनोरंजन

Hardeek Joshi: हार्दिक जोशी खेळणार नियतीचा एक डाव, क्लब 52 सिनेमाची घोषणा

हार्दिक जोशी आता आगामी मराठी सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे

Devendra Jadhav

Hardeek Joshi New Movie Club 52: मराठी मनोरंजन विश्वात सध्या अनेक नाविन्यपूर्ण आणि दर्जेदार सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. बाईपण भारी देवा, वेड, सुभेदार अशा अनेक सिनेमांनी बॉक्स ऑफीसवर चांगली कामगिरी केलीय.

अशातच आणखी एक वेगळ्या विषयावरचा हटके सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात तुझ्यात जीव रंगला फेम सर्वांचा लाडका अभिनेता हार्दिक जोशी झळकणार आहे. या सिनेमाचं नाव आहे क्लब 52.

(hardeek joshi bhau kadam new marathi movie club 52)

दमदार स्टारकास्ट असलेल्या "क्लब 52" या चित्रपटाचे टीजर पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आले. नाथ प्रॉडक्शन्सची प्रस्तुती आणि निर्मिति असलेल्या वैशाली ठाकुर निर्मित "क्लब 52" हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.

हार्दिक जोशीसह हे कलाकार सिनेमात झळकणार

अमित कोळी दिग्दर्शित या चित्रपटाची कथा बजरंग बादशाह यांची असून राकेश शिर्के यांनी पटकथा आणि संवादलेखन केले आहे. कौशल गोस्वामी यांनी छायांकन, करण आणि दर्शन यांनी संगीत, अजय वाघमारे, बजरंग बादशाह, सुजाता पवार यांनी गीतलेखन, आदित्य बेडेकर यांनी पार्श्वसंगीताची जबाबदारी निभावली आहे.

क्लब 52 सिनेमात अभिनेता हार्दिक जोशी, भरत ठाकूर, भाऊ कदम, शशांक शेंडे, यशश्री दसरी, टीना सोनी, राधा सागर, नितीन रुपनवार, उमेश बोलके, संदीप गायकवाड अशी तगडी स्टारकास्ट आहे. महेश गायकवाड यांचे सहकार्य आणि मोलाचे मार्गदर्शन सिनेमाला लाभले आहे.

एक डाव नियतीचा अशी टॅगलाईन असलेल्या "क्लब 52" या चित्रपटाचं नाव मॉडर्न आणि आकर्षक आहे. मात्र नावावरून चित्रपटाच्या कथेचा काहीच अंदाज बांधता येत नाही. त्यामुळे आता चित्रपटाविषयी अधिक उत्सुकता वाढली आहे.

सिनेमा १५ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हार्दिक जोशीचे तमाम चाहते त्याला हर हर महादेव सिनेमानंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर बघायला उत्सुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT