Hardeek Joshi Video Esakal
मनोरंजन

Hardeek Joshi Video: हार्दिकचा शर्टलेस लूक पाहून अक्षया सोशल मीडियावरच झाली लट्टू.. कमेंट करत म्हणाली..

हार्दिक जोशीनं शेअर केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर भलताच व्हायरल होताना दिसत आहे.

प्रणाली मोरे

Hardeek Joshi Video: हार्दिक जोशीचं व्यक्तिमत्त्व भारी आहे यात दुमत नाही. उंचपुरा,पिळदार शरीर हे त्याचे युएसपी आहेत असं म्हटलं तर चुकीचं नक्कीच ठरणार नाही. त्यात तो अंगानं जरी मजबूत असला तरी त्याच्या वागण्यात खूप साधेपणा ठासून भरला आहे. आता 'तुझ्यात जीव रंगला' या त्याच्या मालिकेत म्हणूनच तर त्यानं रंगवलेला 'राणा दा' आजही सगळ्यांच्या मनात आपलं स्थान कायम ठेवून आहे.

त्या मालिकेतील 'राणा दा' आणि 'पाठक बाईं'च्या जोडीनं वेड लावलं होतं प्रेक्षकांना. मालिकाविश्वात आपलं नाव कमावलेला हार्दिक 'हर हर महादेव' या सिनेमात नुकताच आपल्याला दिसला होता. यात त्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याची भूमिका साकारली होती.

त्या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान हार्दिकनं एक व्हिडीओ शूट केला होता. जो त्यानं आता नुकताच पोस्ट केला आहे. त्यात तो शर्टलेस असल्यानं त्याची पिळदार बॉडी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेताना दिसत आहे.(Hardeek Joshi shirtless video viral on social media akshaya devdhar comment)

या व्हिडीओत आपण पाहू शकतो की हार्दिक शर्टलेस आहे आणि एका किल्ल्याच्या कड्यावर उभा राहून पहाटे सूर्यासमोर नतमस्तक होताना दिसत आहे. हार्दिक ज्या रुबाबात व्हिडीओत चालताना दिसत आहे त्याचा थाटच काही और. त्याच्या अंगात जानवं देखील आहे.

या व्हिडीओत हार्दिकचं पिळदार शरीर पाहून लोकांनी मात्र कमेंट्सचा वर्षाव केलेला दिसून येत आहे. पण यात एक कमेंट मात्र लक्ष वेधून घेत आहे ती आहे पाठकबाई अर्थात त्याची पत्नी अभिनेत्री अक्षया देवधरची.

तिनं हार्दिकच्या व्हिडीओवर हार्ट इमोजी पोस्ट केला आहे. तर हार्दिकच्या एका चाहत्यानं लिहिलं आहे, 'फक्त राणादा..' तर अनेकांनी 'हर हर महादेव'चा यलगार आपल्या कमेंटमधून लावला आहे.

तर एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे,'राणादा लय भारी'. तर कुणी एकानं लिहिलं आहे,'एकच नं भावा फक्त राणादा'.

हार्दिकचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हार्दिकचा नवा सिनेमा लवकरच आपल्या भेटीस येत आहे. सध्या हार्दिकनं मालिकांकडून आपला मोर्चा सिनेमाकडं वळवला आहे. त्याचे चाहते देखील त्याच्या या नव्या सिनेमाच्या प्रतिक्षेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : अजितदादांचा नादच खुळा! पुण्याच्या गणपती मिरवणुकीत उपमुख्यमंत्र्यांनी वाजवला ढोल; कसबा गणपतीच्या पालखीलाही दिला खांदा

Latest Maharashtra News Updates : किल्ल्यावर तरुणांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली

Ganpati Visarjan 2025 Live Updates : गणेश गल्लीतील मुंबईचा राजा लालबागमध्ये पोहोचतोय

Miraj Ganpati Visarjan : मिरजेत गणरायाची बैलगाडीतून विर्सजन मिरवणूक, काय आहे वैशिष्ट्य जाणून घ्या

Shreyas Iyer : श्रेयस अय्यर बनणार टीम इंडियाचा 'कर्णधार'; हालचालींना वेग, लवकरच होणार संघाची घोषणा

SCROLL FOR NEXT