Harnaaz Sandhu Comment on Veer Pahariya Post  Esakal
मनोरंजन

Harnaaz Sandhu: मिस युनिव्हर्स हरनाज करतेय महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाला डेट? त्या पोस्टनं सांगून टाकलं....

Vaishali Patil

Harnaaz Sandhu Comment on Veer Pahariya Post: 2021 ची 'मिस युनिव्हर्स' हरनाज संधू ही नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अनेकदा सोशल मिडियावर तिच्या लूकची चर्चा होत असते, हरनाजच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनवरुन अनेकदा तिला ट्रोलही केले जाते.

पण सध्या हरनाज तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आली आहे. काही दिवसांपुर्वी हरनाज 'जिओ वर्ल्ड प्लाझा' च्या लॉन्च इव्हेंटमध्ये वीर पहारियासोबत दिसली होता.

वीर आणि हरनाजचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याच्या अफेअरच्या बातम्या चर्चेत आला.

मात्र दोघांनीही यावर मौन बाळगळे होते. आता मात्र अलीकडेच हरनाजने वीरच्या लेटेस्ट फोटोवर एक कमेंट केली आणि त्यानंतर दोघांच्या अफेअरच्या बातम्या पुन्हा सुरु झाल्या.

वीर पहाडिया बद्दल बोलायचं झालं तर तो सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. अनेकदा वीर त्याचे फोटो शेअर करतो. त्याच्या चाहत्यांची संख्याही कमी नसल्याने हे फोटो काही तासातच व्हायरल होतात.

नुकतचं वीर पहाडियाने त्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये त्याने ग्रे पँटसोबत काळ्या रंगाचा हायनेक परिधान केलेला दिसत आहे. फोटोंमध्ये तो खूपच सुंदर दिसत आहे. नेटकऱ्यांनी या फोटोवर कमेंट केल्या.

मात्र हरनाजच्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधले. हरनाजने फोटोला कमेंट करत लिहिलं आहे की, 'जंगलात एकच राजा आहे.' हरनाजच्या या कमेंटनंतर दोघांच्या डेटिंगच्या बातम्यांना उधाण आलं आहे.

वीर पहाडियाने यापुर्वी सारा अली खानला डेट केले आहे. वीर आणि शिखर पहारिया हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे नातू आहेत. शिखर पहारियाचे नाव जान्हवीसोबत जोडले गेले आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, वीर पहाडिया अक्षय कुमारच्या स्काय फोर्समधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. तर हरनाजही तिच्या काही प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL 1st Test: गौतम गंभीरने खेळपट्टीची पाहणी केली, पाठ वळताच क्युरेटरने 'खेळी' खेळली; कॅप्टन, कोचने एकवटले... माईंड गेम

शूटिंगदरम्यान ज्युनिअर एनटीआरला झालेली गंभीर दुखापत; खांद्यावर झाली शस्त्रक्रिया, आता 2 ते 3 महिन्यांचा घेणार ब्रेक

IND vs SL: शुभमन गिल-रिषभ पंत श्रीलंकेत धुमाकूळ घालणार? WTC मध्ये आजपर्यंत कोणालाही न जमलेला पराक्रम करण्याची संधी

Latest Marathi News Live Update : तुम्ही मला अस्पृश्यासारखी वागणूक देता, 'शुद्धीकरण' करता आणि माझा अपमान करता."- खर्गे राज्यसभेत संतापले

‘Gift a Life After Life’! अवयवदानासाठी ५०० विद्यार्थ्यांचा पुढाकार; ‘Tree Of Life’मधून दिला जीवनाचा संदेश

SCROLL FOR NEXT