Helen McCrory  file photo
मनोरंजन

'हॅरी पॉटर'मधील अभिनेत्री हेलेन मॅकक्रॉरीचं कॅन्सरने निधन

त्या ५२ वर्षांच्या होत्या.

स्वाती वेमूल

'हॅरी पॉटर' या लोकप्रिय फँटसी फ्रँचाइचीमध्ये ड्रेको मॅलफॉयची आई नार्सिसा मॅलफॉयची भूमिका साकारणारी अभिनेत्री हेलेन मॅकक्रॉरी Helen McCrory यांचे निधन झाले. त्या ५२ वर्षांच्या होत्या. हेलेन यांना कॅन्सरने ग्रासले होते. हेलेन यांचे पती डॅमियन लुईस यांनी ट्विट करत शुक्रवारी ही दु:खद बातमी सांगितली. हेलेन यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतल्याचं त्यांनी सांगितलं. 'मला हे सांगताना अत्यंत दु:ख होत आहे की कॅन्सरशी लढा दिल्यानंतर सर्वांत सुंदर आणि सक्षम महिला हेलेनची राहत्या घरी प्राणज्योत मालवली. ती ज्याप्रकारे निर्भिड होऊन आयुष्य जगली, तसाच तिचा मृत्यू झाला. आम्ही तिच्यावर खूप प्रेम करतो आणि तिच्यासोबत आयुष्यात जो काही वेळ घालवायला मिळाला त्यासाठी आम्ही स्वत:ला खूप नशीबवान मानतो', अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.

हेलेन यांच्या निधनावर हॉलिवूडसोबतच बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला. दिग्दर्शक हंसल मेहता आणि इतरही काही कलाकरांनी त्यांना सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली. हेलेन या हॉलिवूड इंडस्ट्रीतल्या सर्वांत प्रसिद्ध आणि प्रतिभावान कलाकारांपैकी एक होत्या. हॅरी पॉटर फ्रँचाइजीमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारली होती. हॅरी पॉटरशिवाय 'पिकी ब्लाइंडर्स'मध्ये त्यांनी पॉली ग्रे ही भूमिका साकारली होती. स्कायफॉल, ह्युगो, द क्वीन आणि द स्पेशल रिलेशनशिप या चित्रपटांमध्येही त्या झळकल्या होत्या.

हेही वाचा : अभिनेता विवेक यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू

चित्रपट आणि टीव्हीसोबत हेलेन यांनी थिएटरमध्येही काम केलं होतं. १९९० पासून २०१० पर्यंत त्यांनी २५ हून अधिक स्टेज प्रॉडक्शन्समध्ये काम केलं. हॅरी पॉटरच्या सहाव्या भागात त्यांनी भूमिका साकारली होती. त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: उद्धव ठाकरेंचा दिल्लीतून सत्ताबदलाचा नारा! 'सीजेपी'च्या आंदोलनाला दिली भेट, दीपकेंचं केलं कौतुक

Supreme Court: 'अपार आयडी'ला सुप्रीम कोर्टाचा रेड सिग्नल! 26 कोटी विद्यार्थ्यांचा प्रश्न; कोर्टाचा मोठा निर्णय

Rahul Gandhi Protest: राहुल गांधींची तीन तासांनंतर सुटका; बाहेर आल्यानंतर प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया...

Marathi Culture: डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या साहित्यिक वारशाचा गौरव; ‘संस्कृती-संशोधन केंद्रा’त चार पुस्तकांचे प्रकाशन

Ambad Highway Chaos: अंबडमध्ये महामार्गावर मोकाट जनावरांचा धुमाकूळ; वाहतुकीला अडथळा, नागरिकांचा जीव मुठीत

SCROLL FOR NEXT