daniel radcliffe Sakal
मनोरंजन

Daniel Radcliffe: हॅरी पॉटरमधील अभिनेत्यानं लग्नाआधीच दिली गुडन्यूज! गर्लफ्रेंड आहे गरोदर

हॅरी पॉटर फेम अभिनेता डॅनियल रॅडक्लिफ आणि त्याची गर्लफ्रेंड एरिन डार्क आई-वडील होणार आहेत. दोघेही 10 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.

सकाळ डिजिटल टीम

हॉलिवूड अभिनेता डॅनियल रॅडक्लिफने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. जरी तो एखाद्या गोष्टीसाठी सर्वात लोकप्रिय असला तरी, ती म्हणजे त्याची हॅरी पॉटर ही सिरीज, ज्याद्वारे त्याने अगदी लहान वयातच जगभरात खूप लोकप्रियता मिळवली. सध्या तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

डॅनियल रॅडक्लिफ आता वडील होणार आहे. त्याची लॉन्ग टर्म गर्लफ्रेंड एरिन डार्क गर्भवती आहे. एका मासिकाच्या हवाल्याने ही बातमी समोर आली आहे, ज्याला अभिनेत्याच्या जवळच्या सूत्राने दुजोरा दिला आहे. मात्र, अभिनेत्याच्या या नव्या प्रवासाबद्दल आतापर्यंत काहीही बोलले गेले नाही.

विशेष म्हणजे डॅनियलप्रमाणेच त्याची गर्लफ्रेंड एरिनही हॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे. त्यांनी अनेक चित्रपट केले आहेत. त्याचवेळी शूटिंगदरम्यान दोघांची प्रेमकहाणीही सुरू झाली. 2013 मध्ये आलेल्या 'किल योर डार्लिंग्स' या चित्रपटात दोघांनी पहिल्यांदा एकत्र काम केले होते. त्याचवेळी पहिल्या भेटीतच दोघेही एकमेकांना पंसत करायला लागले.

किल योर डार्लिंग्सच्या सेटवर पहिल्या भेटीनंतर दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. त्याच वेळी, दोघांच्या नात्याला जवळपास 10 वर्षे झाली आहेत. जरी दोघांनी अद्याप लग्न केले नाही. आणि आता या दोघांच्या आयुष्यात तिसरा येणार आहे.

किल योर डार्लिंग्ज व्यतिरिक्त, डॅनियल रॅडक्लिफ आणि एरिन डार्क हे 2016 मधील चित्रपट डोंट थिंक ट्वाईस आणि 2021 मधील मिरॅकल वर्कर्सच्या तिसऱ्या सीझनमध्ये एकत्र दिसले होते. एकदा, एरिनसोबत काम करण्याचा अनुभव सांगताना, डॅनियल म्हणाला की एकत्र काम करणे खूप छान आहे आणि खूप खास वाटते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधींनी ब्राझिलियन मॉडेलचा फोटो दाखवून टाकला नवा बॉम्ब ! २२ वेळा मतदान, कोण आहे ती? सीमा, स्विटी, सरस्वती...;

Women's World Cup : कर्णधाराने ज्युनियर खेळाडूला कानाखाली खेचली... वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान महिला खेळाडूसोबत गैरवर्तवणुक, बोर्डाने दिली प्रतिक्रिया

Katraj Tunnel : कात्रज बोगद्याच्या दुरुस्तीचा प्रस्ताव फेटाळला; प्रशासनाच्या निर्णयावर नागरिक संतप्त

Nashik News : नाशिक विकासकामांना 'ब्रेक'; पालकमंत्र्यांअभावी १० महिने थांबलेली कामे आता आचारसंहितेच्या कचाट्यात!

Latest Marathi News Live Update : जालना शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस सुरूच, पाच जणांना घेतला चावा

SCROLL FOR NEXT