Prajakta Mali, Vanita Kharat
Prajakta Mali, Vanita Kharat Esakal
मनोरंजन

Vanita Kharat: बॉलीवूडच्या 'या' दिग्गज अभिनेत्रीशी वनितानं केली प्राजक्ताची तुलना, म्हणाली..

प्रणाली मोरे

Vanita Kharat: सध्या सोनी मराठी वाहिनीवर सुरु असलेल्या 'पोस्ट ऑफिस उघडं आहे' मालिकेत प्राजक्ता माळीची एन्ट्री होणार आहे. प्राजक्ता अनेक दिवसांनी मालिकेत दिसणार असल्यानं अर्थात तिचा चाहता वर्गही बराच खूश आहे. लवकरच ही मालिका खरंतर संपणार आहे अशी मालिकेच्या दि्ग्दर्शकांची पोस्ट समोर आली आहे. कारण मालिका काही भागांचीच करायची असं आधीच ठरलं होतंच.

पण आता मालिका संपता संपता प्राजक्ता मालिकेत दिसणार असल्यानं अर्थात शेवट गोड होणार हे नक्की. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधील बरेच कलाकार या मालिकेत आपल्याला दिसले. त्यापैकी एक वनिता खरात आणि अर्थात त्या कार्यक्रमाची निवेदिका प्राजक्ता माळी.

या मालिकेच्या शूटिंग दरम्यान प्राजक्ता एका फ्रॉकमध्ये इतकी सुंदर दिसत होती की तिला पाहून वनिता खरातला बॉलीवूडची दिग्ग्ज अभिनेत्री आठवली आहे. सध्या तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Hasyajatra Fame Vanita Kharat Compare Prajakta Mali with One great bollywood actress)

पोस्ट ऑफिस उघडं आहे या मालिकेच्या सेटवरचा एक व्हिडीओ सध्या व्हरायरल होतोय. त्यात प्राजक्तानं ८० च्या दशकात मिस्ट इंडिया सिनेमात श्रीदेवीनं जसा ड्रेस घातला होता अगदी तसाच एक फ्रॉक घातला आहे. आणि त्यात प्राजक्ताला पाहून वनिता खरातला मोह आवरला नाही अन् तिनं प्राजक्ताची स्तुती करत म्हटलं की मला ती श्रीदेवीसारखीच दिसत आहे..व्हिडीओ व्हायरल झाला अन् प्राजक्ताचे चाहते मात्र यानं सुखावले.

प्रेक्षकांचे लाडके ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे यांनीही 'पोस्ट ऑफीस उघडं आहे...' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं. सोबतच हास्यवीर समीर चौघुले, प्रभाकर मोरे, अरुण कदम, पृथ्वीक प्रताप, ईशा डे, वनिता खरात, ओम्कार राऊत, शिवाली परब, संदेश उपश्याम, दत्तू मोरे, रसिका वेंगुर्लेकर, निखिल बने या कलाकारांनीही धमाल आणलेली आपण पाहिली असेल.

सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी या जोडीनी आजपर्यंत प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून आजवर त्यांनी प्रेक्षकांना हसायला भाग पडलं आहे. आता 'पोस्ट ऑफीस उघडं आहे...' या त्यांच्या पहिल्या मालिकेद्वारे त्यांनी हास्याचा धमाकाच केला. त्याचबरोबर प्रेक्षकांना जुन्या आठवणींमध्ये देखील घेऊन गेले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case: केजरीवालांच्या पीएला ५ दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

J-K Terrorist Attacks: जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले, अनंतनागमध्ये पर्यटक जोडप्यावर गोळीबार, भाजप नेत्याची हत्या

IPL 2024 Playoffs Schedule : प्लेऑफचे शेड्यूल! कुठे अन् कधी कोणत्या संघांमध्ये होणार क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामने?

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

SCROLL FOR NEXT