rasika sunil Instagram
मनोरंजन

अखेर 'शनाया'च्या लग्नाचा फोटो आला समोर

१८ ऑक्टोबर रोजी रसिका-आदित्यने गोव्यात बांधली लग्नगाठ

स्वाती वेमूल

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत शनायाची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रसिका सुनील हिने १८ ऑक्टोबर रोजी लग्नगाठ बांधून चाहत्यांना सुखद धक्का दिला. गोव्याच्या समुद्रकिनारी रसिकाने प्रियकर आदित्य बिलागीशी लग्न केलं. या दोघांनी लग्नाचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. मात्र त्यामध्ये दोघांचा लूक स्पष्टपणे दिसत नव्हता. अखेर आता त्यांनी लग्नाचा आणखी एक फोटो पोस्ट केला आहे. यावर चाहते आणि सेलिब्रिटींकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. यामध्ये रसिकाने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी तर आदित्यने निळ्या आणि सोनेरी रंगाची शेरवानी परिधान केली आहे. समुद्रकिनारा, सूर्यास्ताची वेळ आणि नवविवाहित रसिका-आदित्य यांच्या या फोटोने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

'तेरे मेरे बीच मे क्या है', असं कॅप्शन देत या दोघांनी हा खास फोटो पोस्ट केला आहे. याआधीच्या आणखी एका फोटोमध्ये या दोघांचा साखरपुड्याचा लूक पहायला मिळतोय. यामध्ये रसिकाने गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे. तर हळदीच्या कार्यक्रमात या दोघांनीही दाक्षिणात्य पद्धतीचा लूक केला होता. आदित्यने रसिकाला उचलून घेतल्याचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. शाहरुख खानच्या 'चेन्नई एक्स्प्रेस'मधील एका दृश्यासोबत या फोटोचे मीम्ससुद्धा तयार करण्यात आले आहेत.

दोन वर्षांपूर्वी रसिका 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका सोडून लॉस एंजिलिसला पुढील शिक्षणासाठी गेली होती. तिथे तिची आदित्यशी ओळख झाली. १ जानेवारी रोजी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत असतानाच रसिकाने तिचं रिलेशनशिप जाहीर केलं होतं. ‘सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. २०२० या वर्षभरात अनेक वाईट घडामोडी घडल्या असल्या तरी कृतज्ञ राहण्यासाठी या वर्षाने अनेक कारणं दिली आहेत’, असं कॅप्शन देत तिने आदित्यसोबतचा रोमँटिक फोटो पोस्ट केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: ''मी 'आरएसएस'चेही रक्षण करणार'', राहुल गांधींचं मोठं विधान, संघाबद्दल नेमकं काय म्हणाले?

WTC Final Qualification Scenario: भारताला फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर उरलेले सामने महत्त्वाचे; जाणून घ्या टीम इंडियाचं गणित

मला तिचे बॉयफ्रेंड आवडत नाहीत... लेकीच्या रिलेशनशिपवर संजय जाधव यांचं स्पष्ट मत; म्हणाले, 'तुम्ही घरी या, बोला, पण...'

NHAI New Rules: रुग्णवाहिका उशिरा आली तर दंड होणार! NHAI चा मोठा निर्णय; सर्व प्रकल्पांत ‘केअर सिस्टम’ बंधनकारक, नवे नियम काय?

BMC Recruitment: मुंबई महापालिकेत ६१२ जागांवर भरती; ITI पास तरुणांना मोठी संधी! पाहा कोणती पदे आणि अर्ज प्रक्रिया काय?

SCROLL FOR NEXT