Devoleena Bhattacharjee and Nia Sharma  
मनोरंजन

पर्ल पुरीच्या अटकेवरून दोन अभिनेत्रींमध्ये जुंपली

'छोटीला इतकी मिर्ची का लागली?', देवोलिनाने नियाला सुनावलं

स्वाती वेमूल

अल्पवयीन मुलीच्या बलात्कारप्रकरणी अटकेत असलेल्या अभिनेता पर्ल व्ही. पुरीवरून Pearl V Puri आता दोन अभिनेत्रींमध्ये सोशल मीडियावर शाब्दिक बाचाबाची सुरू झाली आहे. 'साथ निभाना साथिया' फेम अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी Devoleena Bhattacharjee आणि निया शर्मा Nia Sharma या दोघींमध्ये ट्विटरवर जुंपली आहे. २०१९ मध्ये एका अल्पवयीन मुलीच्या बलात्कारप्रकरणी पर्लला अटकेनंतर १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. (heated argument between Devoleena Bhattacharjee and Nia Sharma over Pearl V Puri rape case)

पर्लचा बाजू घेणाऱ्या नियाने ट्विट करत देवोलिनाची खिल्ली उडवली. 'दीदीला कोणीतरी जाऊन सांगा की धरणा आणि कँडल मार्च करू शकत नाही, कारण कोरोना महामारी आहे. त्याचसोबत दीदीला ते विचित्र डान्स रिल्स बनवण्यापूर्वी डान्सचा सराव करण्याची खूप गरज आहे.'

निया शर्माच्या या ट्विटला देवोलिनाने सडेतोड उत्तर दिलं. 'प्लीज छोटीला जाऊन कोणीतरी हे सांगा की फक्त फॅशन स्कील्स दाखवल्याने कोणी चांगला मनुष्य बनत नाही. चांगले विचार आणि चांगलं हृदय असणं गरजेचं असतं, ज्याची कमतरता तिच्यात दिसतेय. मी माझे डान्स रिल्स व्हिडीओ चांगले करते की नाही ते माझ्या चाहत्यांनाच ठरवू दे. इथेसुद्धा परीक्षक होऊन बसली आहे. त्यापेक्षा तू तुझ्या फोटोशूट्सवर लक्ष दे.'

'सात वर्षीय छोट्या मुलीवर टीका करणाऱ्या सर्वांसाठी माझे हे ट्विट्स आहेत. फक्त छोटीलाच का मिर्ची लागली? कदाचित ती त्या लोकांपैकी एक असेल जे, सत्य पडताळून न पाहता बातम्यांवर लगेच प्रतिक्रिया देत असतात', असंही देवोलिनाने नियाला सुनावलं.

पर्ल पुरीच्या अटकेनंतर नियाने त्याला पाठिंबा देणारं ट्विट करत संबंधित पीडित मुलीवर टीका केली होती. टीव्ही इंडस्ट्रीतील एकता कपूर, अनिता हसनंदानी, अली गोनी आणि क्रिस्टल डिसूझा यांसारख्या सेलिब्रिटींनीही पर्लची बाजू घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT