heena panchal item song
heena panchal item song  
मनोरंजन

हीना पांचाल म्हणतेय टकमक टकमक नजरा तुमच्या

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : सध्या मराठी चित्रपटात एकापाठोपाठ एक हिंदीतील तारका आयटम सॉंगवर थिरकताना दिसतायेत. बॉलीवूड आणि टॅालीवूडला आपल्या मोहक अदांनी घायाळ करणारी अभिनेत्री हिना पांचाल आता मराठी चित्रपटात आपला जलवा  दाखवणार आहे. श्री धनलक्ष्मी प्रोडक्शन प्रा.लि प्रस्तुत ‘काय झालं कळंना’ या मराठी चित्रपटात हिना पांचाल वर एक धमाकेदार आयटम नंबर चित्रीत झालं आहे.

‘टकमक टकमक नजरा तुमच्या, होऊ दे आता बत्ती गुल’ असे बोल असलेल्या या हटके आयटम सॉंगचे चित्रीकरण नुकतेच झाले. या आयटम सॉंगची कोरीओग्राफी सुजीत कुमार यांनी केली आहे. संगीतकार पंकज पडघन यांचं हे पहिलं आयटम सॉंग आहे. वलय मुलगुंद यांनी हे गीत लिहिले आहे. हे आयटम सॉंग करताना मला खूप मजा आली. प्रेक्षकांनाही हे आयटम सॉंग ठेका धरायला लावेल असा विश्वास हिना यांनी व्यक्त केला. चित्रपटातील हिनाचा हॉट अंदाज मराठी चित्रपटासाठी भन्नाट तडका असणार हे नक्की.

‘काय झालं कळंना’ या चित्रपटातून वेगळ्या धाटणीची हलकी–फुलकी प्रेमकथा पहायला मिळणार आहे. या चित्रपटाची  निर्मिती पंकज गुप्ता यांची असून दिग्दर्शन सुचिता शब्बीर यांचं आहे. अरुण नलावडे, संजय खापरे, वंदना वाकनीस, गिरीजा प्रभू, कल्पना जगताप, स्वप्नील काळे, सुयश झुंजुरके, रवी फलटणकर, श्रद्धा सुर्वे, हेमाली कारेकर या कलाकारांनी या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT