Hema Malini Birthday Party  esakal
मनोरंजन

Hema Malini Birthday : 'फोटोला कशी पोझ द्यायची हे तुम्ही नाही सांगायचं'! हेमा मालिनींच्या जन्मदिनी....

बॉलीवूडमधील वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी देखील हेमाजींना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

युगंधर ताजणे

Hema Malini Birthday Party - बॉलीवूडमध्ये हेमा मालिनी यांनी ड्रीम गर्ल म्हणून आपल्या नावाची वेगळी ओळख तयार केली आहे. त्या आज आपला ७५ वा जन्मदिवस साजरा करत आहे. चाहत्यांनी आपल्या आवडत्या सेलिब्रेटीला शुभेच्छा देत त्यांचे अभिष्टचिंतन केले आहे. अशातच हेमाजींच्या जन्मदिनी आयोजित करण्यात आलेल्या त्या कार्यक्रमात जे घडलं त्याची चर्चा होताना दिसत आहे.

बॉलीवूडमधील वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी देखील हेमाजींना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हेमा मालिनी यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला बॉलीवूडमधील प्रख्यात अभिनेत्री उपस्थित होत्या. त्यात पद्ममिनी कोल्हापुरे यांच्यासह जया बच्चन देखील हजर होत्या.

Also Read - Navratri 2023 : तलवारीचं 'स्त्री'त्त्व आणि आदिमायेच्या गुणतत्त्वांचा सहसंबंध काय आहे?

हेमा मालिनी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून एका ग्रँड पार्टीचे आय़ोजन करण्यात आले होते. यावेळी जया बच्चन यांनी हेमाजींनी शुभेच्छा दिल्या. त्या शुभेच्छा देण्यासाठी स्टेजवर येताच फोटोग्राफर्सनं त्यांना काही सुचना केल्या. त्या ऐकून जयाजी भडकल्या. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मी फोटोला कशाप्रकारे पोझ द्यायची हे तुम्ही मला सांगण्याची गरज नाही. अशा शब्दांत त्यांनी पापाराझ्झींना धारेवर धरल्याचे दिसून आले आहे. जयाजी या नेहमीच त्यांच्या परखड स्वभावाबद्दल ओळखल्या गेलेल्या सेलिब्रेटी आहेत. त्यांनी यापूर्वी देखील सडेतोडपणे पापाराझ्झींना जशास तसे सुनावले आहे.

हेमा मालिनी यांच्या जन्मदिनानिमित्तानं मुंबईमध्ये एका खास पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात जयाजी सहभागी झाल्या होत्या. त्याच बरोबर धर्मेंद्र, ईशा देओल, सलमान खान, राणी मुखर्जी, रविना टंडन, विद्या बालन, अनुपम खेर, जॅकी श्रॉफ, राकेश रोशन, तुषार कपूर, रेखा, माधुरी दीक्षित आणि शिल्पा शेट्टी हे सेलिब्रेटी सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: आनंदाची बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवे दहा पदरी होणार; चार नव्या लेनसाठी राज्य सरकारचं नियोजन काय?

Stock Market Closing : बाजारातील तेजी सलग सहाव्या दिवशीही कायम; निफ्टीने ओलांडला 26000 चा टप्पा; कोणते शेअर्स फायद्यात?

Viral Video: शिल्पा शेट्टीची 'बिबट्या साडी' पाहिलीत का? लाल साडीत हॉट अंदाज, अन् पदरावर भला मोठा बिबट्या

Latest Marathi Breaking News:अमित ठाकरे यांची त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यावर पहिली प्रतिक्रिया

Mumbai News: जिथं भविष्याची स्वप्नं पाहिली त्याच शाळेने माझ्या मुलीचा जीव घेतला, चिमुकलीच्या आईचा मन हेलावणारा टाहो!

SCROLL FOR NEXT