Hema Malini and Dharmendra  sakal
मनोरंजन

Hema Malini: धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नाला झाली 43 वर्षे पूर्ण, अभिनेत्री म्हणाली 'हे 43 वर्षे माझ्यासाठी...'

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांच्या लग्नाला आज ४३ वर्षे पूर्ण झाली आहेत.

Aishwarya Musale

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांच्या लग्नाला आज ४३ वर्षे पूर्ण झाली आहेत. 1980 मध्ये याच दिवशी सिनेसृष्टीतील या दोन दिग्गज कलाकारांचे लग्न झाले होते. या खास दिवशी हेमा मालिनी यांनी ट्विटरवर धर्मेंद्रसोबतचे त्यांचे अनेक संस्मरणीय फोटो शेअर केले आहेत.

'तुम हसीन मैं जवान' या चित्रपटाच्या सेटवर सुरू झालेली मैत्री आणि त्यानंतर हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांचा विवाह असा 43 वर्षांचा प्रवास अनेक अविस्मरणीय क्षणांसह सुरू आहे. हेमा मालिनी यांनी लग्नाच्या वर्धापनदिनानिमित्त तिचे प्रेम धर्मेंद्रसोबतचे अनेक संस्मरणीय आणि रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.

पहिल्या ट्विटमध्ये हेमा मालिनी यांनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत. हेमा मालिनी यांनी धर्मेंद्रसोबतचा त्यांचा सहवास हा अतिशय खास प्रवास असल्याचे वर्णन केले आणि भविष्यातही हा प्रवास सुरूच राहणार असल्याचे सांगितले. यासोबत त्यांनी गेल्या काही वर्षांचे फोटो शेअर केले. फोटोत हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची जोडी अप्रतिम दिसत आहे.

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र एकमेकांच्या प्रेमात पडले होते, परंतु लग्न करणे सोपे नव्हते कारण धर्मेंद्र आधीच विवाहित होते आणि त्यांना मुले होती. धर्मेंद्र यांना पत्नीला घटस्फोट घ्यायचाही नव्हता. अशा परिस्थितीत एक मोठे पाऊल उचलत धर्मेंद्र यांनी इस्लाम धर्म स्वीकारला. धर्मेंद्रचे नाव दिलावर आणि हेमाचे नाव आयेशा बी ठेवले आणि दोघांनी लग्न केले.

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांना लग्नानंतर ईशा देओल आणि आहाना देओल या दोन मुली झाल्या. याआधी धर्मेंद्रला त्याच्या पहिल्या लग्नापासून चार मुले होती, ज्यात सनी देओल, बॉबी देओल, विजेता आणि अजिता यांचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PNEUMONIC PLAGUE: रशियातील लॅबमध्ये काम करणाऱ्या तरुणीचा मृत्यू; नक्की काय आहे 'न्यूमोनिक प्लेग'? जाणून घ्या कारणं आणि लक्षणं

Dearness Allowance Hike: कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! व्हेरिएबल डीए वाढला; नेमका किती आणि कोणाला फायदा होणार?

२ केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट होणार, मोदी कॅबिनेटमध्ये फेरबदलाच्या चर्चांना उधाण; ५ जागा रिक्त, आप-शिवसेनेला संधी?

Australia A विरुद्ध सुरु होणार ODI मालिका! हार्दिक, नमनची माघार; तरीही भारताची तगडी फौज मैदानात; जाणून घ्या डिटेल्स

Pune News : मनोज जरांगे यांना प्रश्‍न विचारल्‍याने ट्रोलधाड; रेखा कोंडे यांचा जरांगेंवर आरोप, टेंडर प्रक्रियेवरून मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT