Hema Malini's birthday celebration Esakal
मनोरंजन

Hema Malini's Birthday: बर्थडे 'ड्रीम गर्ल'चा अन् जल्लोष साऱ्या बॉलिवूडचा ! हेमा मालिनींचा 75 वा वाढदिवस जोरात साजरा

Hema Malini's birthday celebration: बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांचा 16 ऑक्टोबर रोजी वाढदिवस होता. यावेळी त्याच्या वाढदिवसाच्या आयोजित पार्टीत अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली.

Vaishali Patil

Hema Malini बॉलिवूडची 'ड्रीम गर्ल' हेमा मालिनी यांनी 16 ऑक्टोबरला आपला 75 वा वाढदिवस साजरा केला. हेमा मालिनी यांना वाढदिवसानिमित्त बॉलिवूड कलाकारांसोबत सर्व चाहत्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.

तर हेमा मालिनी यांनी वाढदिवसानिमित्त एक जोरदार पार्टीही दिली. यापार्टीत अनेक बॉलिवूड कलाकारांनी सहभाग घेतला होता. यावेळी हेमा मालिनी यांच्यासोबत त्याचे पती धर्मेंद्र आणि त्यांच्या दोन मुली ईशा देओल आणि आहाना देओलही त्याच्यासोबत दिसल्या.

हेमा मालिनी त्यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत अतिशय ग्लॅमरस लूकमध्ये दिसल्या. गुलाबी रंगाच्या शिमर साडीमध्ये ड्रिम गर्ल खूपच सुंदर दिसत होत्या.

यावेळी त्यांनी डायमंड नेकलेस,कानातले आणि मॅचिंग बांगड्यांसह त्याचा लूक पुर्ण केला होता. या वयातही हेमा मालिनी यांचे सौंदर्य अतुलनीय आहे. सर्व बॉलिवूड कलाकारांच्या उपस्थीत त्यांनी वाढदिवसाचा केक कापला होता.

हेमा मालिनी यांच्या वाढदिवसाच्या पार्टीचे बरेच व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या बर्थडे पार्टीत माधुरी दीक्षित पती राम नेनेसोबत पोहोचली तर राणी मुखर्जी, रेखा आणि जॅकी श्रॉफही दिसले.

त्यासोबतच रवीना टंडन आणि विद्या बालन यांनीही पार्टीत हजेरी लावली होती. यावेळी रवीना को-ऑर्डरच्या सेटमध्ये तर विद्या साडीत खुपच सूंदर दिसत होती.

या पार्टीत सगळ्याचे लक्ष वेधून घेतले ते जया बच्चन आणि पद्मिनी कोल्हापुरी यांनी. नेहमीप्रमाणे यावेळीही जया बच्चन पापाराझींना ओरडताना आणि त्यांना शांत करताना दिसल्या.

शिल्पा शेट्टी तिची आई आणि शमिता शेट्टीसोबत या पार्टीत पोहचली तर सलमान खानही आपल्या अंदाजात दिसला.

मात्र या पार्टीत सनी , बॉबी आणि त्याचे कुटूंब आले नव्हते त्यामुळे सोशल मिडीयावर त्यांची चर्चाही सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

'त्या'व्हायरल व्हिडीओवर अखेर गौतमी पाटील बोलली, म्हणाली... 'लाज नाही वाटली?'

Latest Marathi News Live Update : काँग्रेस दिशाहीन, किरेन रिजिजू यांची टीका

Mumbai News: जीटीबीनगरवासीयांना भाड्याचा दिलासा! निवासींना २० तर गाळेधारकांना १० हजार रुपये

Pachod News : दावरवाडी परिसरातील सहा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रेच पडलीत आजारी!

SCROLL FOR NEXT