hemangi kavi angry on netizens vulgar comment on photo actress viral post on social media SAKAL
मनोरंजन

Hemangi Kavi: छत्रपती शिवाजी महाराज BIO मध्ये आणि प्रत्यक्षात... हेमांगीचा संताप, नेमकं काय घडलं?

हेमांगी कवीने सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केलाय

Devendra Jadhav

Hemangi Kavi News: हेमांगी कवी ही मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेतील अभिनेत्री. हेमांगीने आजवर नाटक, सिनेमा, मालिका अशा विविध माध्यमांमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. हेमांगी सोशल मीडियावर अनेक गोष्टींबद्दल व्यक्त होत असते.

हेमांगीला सोशल मीडियावर एका नेटकऱ्याचा संतापजनक अनुभव आलाय. त्याबद्दल हेमांगीने इन्स्टाग्राम स्टोरीवर भाष्य करत तीव्र संताप व्यक्त केलाय.

हेमांगीने सोशल मीडियावर व्यक्त केला संताप

हेमांगीच्या एका फोटोवर नेटकऱ्याने विचित्र कमेंट केलीय. त्यामुळे हेमांगीने सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केलीय. हेमांगी लिहीते, "Bio मध्ये छत्रपती शिवाजी महाराज, गणपती बाप्पा, Indian Army! आणि प्रत्यक्षात वागताना??? असली माणसं आतून जनावरच असतात, ‘माणसा'चं कातडं घालून समाजात हिंडत असतात! हे कुठल्याही चित्रपट, नाटकापेक्षा जास्त घातक आहेत. चित्रपट काल्पनिक असतो पण अशी जनावरं आपल्या आजूबाजूला आहेत, खरीखुरी! वार करतात आणि पकडलेही जात नाहीत! माझ्यासाठी हा violence च आहे!"

नेटकऱ्याने कमेंट डिलीट केल्यावर हेमांगी लिहीते...

पुढे हेमांगीने इन्स्टास्टोरीमध्ये स्क्रीनशॉट टाकल्याने नेटकऱ्याने कमेंट डिलीट केली. हे लक्षात येताच हेमांगी लिहीते, "While everyone is arguing about it.... जरा या माणसाचं BIO बघा! असल्या जनावरांचं काय करायचं? मी हे story मध्ये post केल्यावर याने ही comment delete केली, म्हणून ही story तुम्हांला दिसत नाहीए! चला, आपण आपल्या bio मध्ये ज्यांचा उल्लेख केलाय त्यांची आठवण आली असावी! चांगलंय!"

याविषयी अनेकांनी हेमांगीचं कौतुक केलं असुन नेटकऱ्याबद्दल संताप व्यक्त केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs KKR : मुकुल चौधरीने लखनौला रोमहर्षक विजय मिळवून दिला, संजीव गोएंका यांनी त्यानंतर काय केलं ते पाहा Video Viral

Mukul Choudhary: देवाने मला संधी दिली...! मुकुल चौधरीचे मन जिंकणारं विधान; म्हणाला, गावातील तरुण सीमेवर लढत आहेत, मी...

Who is Mukul Choudhary? लखनौ सुपर जायंट्सचा 'टायगर'! कोलकाता नाइट रायडर्सच्या जबड्यातून विजय खेचून आणणारा नायक...

KKR vs LSG Live: मुकुल चौधरीने KKR च्या हातून मॅच खेचून नेली; लखनौचा रोमहर्षक विजय, IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जायचं असेल तर 'क्रिप्टोकरन्सी' किंवा चिनी 'करन्सी'मध्ये व्यवहार करा! इराणकडून नियमांची यादी

SCROLL FOR NEXT