hemangi kavi emotional post on n d mahanor and nitin desai death SAKAL
मनोरंजन

N D Mahanor: अलविदा, रानकवी..! हेमांगी कवी ना.धों. महानोरांच्या निधनानंतर भावुक

हेमांगी कवीने निसर्गकवी ना.धों. महानोरांबद्दल भावुक पोस्ट केली

Devendra Jadhav

मराठी मनोरंजन विश्वाला सलग दोन धक्के बसले. बुधवारी लोकप्रिय कलादिग्दर्शक नितीन देसाईंचं निधन झालं. तर गुरुवारी ना.धों. महानोर यांच्या निधनाने सर्वांना धक्का बसलाय. या दोन दिग्गज व्यक्तीमत्वांच्या निधनाने अनेक कलाकारांनी भावुक पोस्ट शेअर केल्या आहेत.

अशातच मराठी अभिनेत्री हेमांगी कवीने या दोन दिग्गजांबद्दल भावुक पोस्ट केलीय. हेमांगीने सोशल मिडीयावर शोक व्यक्त केलाय.

(Hemangi Kavi emotional post on n d mahanor and nitin desai death)

हेमांगी लिहीते.. काल नितीन देसाई गेल्याची बातमी ऐकल्यापासून त्यांनी निर्माण केले भव्या दिव्य sets डोळ्यासमोर येत राहीले कुठल्या कुठल्या सिनेमातले आणि कानात एकच गाणं ऐकू येत होतं. त्यांनीच दिग्दर्शित केलेल्या ‘अजिंठा’ सिनेमातलं…‘मन चिंब पावसाळी झाडात रंग ओले
घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले’

हेमांगी पुढे लिहिते, "का कुणास ठाऊक? रात्री याच गाण्यातली पावसाळी दृश्य पापण्यांवर तरळत राहीली आणि ओळी ऐकू येत राहील्या. अगदी झोप लागेपर्यंत! सकाळी उठले आणि कळलं आज ‘ना.धो. महानोर’ गेले! काही प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत ती अशी!
आज दिवसभर जैत रे जैत, एक होता विदूषक, मुक्ता, सर्जा मधली गाणी कानात घुमत राहतील!
“काल्या एकल्या राती मन मोडून जातीअसं एखादं पाखरू वेल्ल्हाळ ज्याला सामोरं येतया आभाळं” अलविदा, रानकवी!

ना. धों. महानोर यांचं पुण्यात निधन

प्रसिद्ध निसर्गकवी ना. धों. महानोर यांचं पुण्यातील रुबी हॉस्पीटलमध्ये उपचारादरम्यान निधन झालंय. ते ८१ वर्षांचे होते.

गेल्या काही दिवसांपासुन ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. प्रकृती ढासळल्याने त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. उद्या पळसखेड या त्यांच्या मुळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT