Hemangi Kavi Best Maa Awards esakal
मनोरंजन

Hemangi Kavi : समोरुन 'जय महाराष्ट्र' ऐकू आलं अन् उर भरुन आला! हेमांगीची भावूक पोस्ट, ‘Best Maa’ चा मिळाला पुरस्कार

हेमांगीच्या (Hemangi Kavi Viral Post) त्या पोस्टनं नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांना उधाण आल्याचे दिसून येत आहे.

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

Hemangi Kavi Latest news : प्रसिद्ध मराठी अभिनेत्री हेमांगी कवी ही एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे. एरवी आपल्या फोटो आणि पोस्टमुळे (Hemangi Kavi Marathi Actress) नेटकऱ्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या हेमांगीला आता एका पुरस्कारानं गौरविण्यात आले आहे. त्याबद्दल तिनं व्यक्त केलेल्या भावना नेटकऱ्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडत आहे.

तो पुरस्कार स्विकारल्यानंतर हेमांगीनं इंस्टावर खास पोस्टही शेयर केली आहे. त्यात तिनं म्हटलं आहे की, मातृभाषेच्या दिनी मला झी रिश्ते अवॅार्डस् (Hemangi Kavi Viral Post) २०२४ मध्ये माझ्या ‘कैसे मुझे तुम मिल गए’ या हिंदी मालिकेतल्या ‘भवानी चिटणीस’ या व्यक्तीरेखेसाठी ‘Best Maa’ चा पुरस्कार मिळाला!

माझ्यासाठी हा एक सुखद धक्काच होता. रंगमंच्यावर गेल्यावर कळेना कुठल्या भाषेत माझ्या भावना व्यक्त कराव्या कारण समोर बसलेले बहुतांश लोक हिंदी भाषिक होते. मला हे माहीत असतानाही माझ्या तोंडून माझी मातृभाषा आली. ऐकणाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मी नम्रपणे माफी मागून मराठीत बोलू लागले आणि जेव्हा समोरून ‘जय महाराष्ट्र’ ऐकू आलं तेव्हा तर उर भरून आला, बळ मिळालं!

हेमांगी पुढे म्हणते की, ज्या प्रकारे अर्जुन बिजलानी आणि हर्ष लिंबाचियाने मराठीत बोलल्यावर प्रोत्साहन दिलं तेव्हा तर आहाहा खूपच भारी वाटलं! रंगमंच्यावरून खाली आल्यानंतर बऱ्याच हिंदी भाषिक कलाकारांनी मी मराठीत व्यक्त झाल्याचं कौतुक केलं! आपलं आपल्या भाषेवर अतोनात प्रेम असलं की आपण दुसऱ्या भाषेवर ही तितकंच प्रेम करतो!आपल्या मराठी भाषेला मिळालेलं प्रेम पाहून कायच्या काय भारी वाटतंय! जय महाराष्ट्र!

अशा शब्दांत हेमांगींन तिच्या भावना व्यक्तकेल्या असून चाहत्यांनी त्यावर दिलेल्या प्रतिक्रियाही तिच्याविषयी खूप काही सांगून जाणाऱ्या आहेत. आपल्या भूमिकेनं आणि परखड वक्तव्यानं हेमांगीनं नेहमीच नेटकऱ्यांचे, चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले असून तिची ही नवी पोस्टही खास चर्चेचा विषय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police Restrictions: पुण्यात आज रात्रीपासून १४ दिवसांसाठी जमावबंदी का? नेमकं कारण काय?

Kolhapur Student End Life : वडील, भावाने गाडीवरून कॉलेजला सोडलं नाही; चिडून थेट गळफासचं घेतला, कोल्हापुरातील घटनेनं खळबळ

Latest Marathi News Live Update : कांद्याला हमीभावासाठी शेतकऱ्यांचा संताप उसळला

रणवीर सिंह आता बॉलिवूडमध्ये काम करु शकणार नाही? ‘डॉन 3’ वादात रणवीर सिंह अडचणीत, FWICE ची मोठी कारवाई

Kolhapur कार-कंटेनरची धडक, २८ वर्षीय डॉक्टरचा जागीच मृत्यू; हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या दिवशीच काळाचा घाला

SCROLL FOR NEXT