Hemangi Kavi shared Apology post After Birthday Netizens React  sakal
मनोरंजन

Hemangi Kavi: "तुम्ही मला माफ कराल अशी मी आशा..", हेमांगी कवीचा माफीनामा; पोस्ट व्हायरल

Vaishali Patil

Hemangi Kavi shared Apology post: मराठी मनोरंजन विश्वातील एक कायम चर्चेत राहणार नाव म्हणजे हेमांगी कवी. तिने अनेक मालिका, चित्रपट, नाटकाद्वारे अभिनयाची छाप सोडली आहे. हेमांगी अभिनयासोबतच अनेक वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असते.

खास करुन हेमांगी तिच्या पोस्टसाठी चर्चेत असते. ती तिच्या अभिव्यक्तीच्या आधारावर अत्यंत परखडपणे तिचे पुरोगामी विचार लोकांपर्यंत पोहचवते. ती कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते.

हेमांगी कवीने काल तिचा 35 वा वाढदिवस साजरा केला आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला होता.

अनेक कलाकार मंडळींनी देखील पोस्ट शेयर करत तिला शुभेच्छा दिल्या. वाढदिवशी हेमांगी खुपच व्यस्त होती मात्र तिने आत्ता सोशल मीडियावर चाहत्यांसाठी खास पोस्ट शेयर केली आहे.

तिचे काही फोटो शेयर केले आहेत. यात ती इंडो-वेस्टर्न लूकमध्ये दिसतेय. फोटो शेयर करत तिने लिहिले की, काल तुम्ही माझ्या वाढदिवसानिमित्त वेळात वेळ काढून मला शुभेच्छा देण्यासाठी msgs, phone calls, Dms केले त्यासाठी मी तुमचे आभार मानते. काहींचे calls मी घेऊ शकले नसेन, msgs वाचू शकले नसेन, reply देऊ शकले नसेन, tags पाहू शकले नसेन, stories remention करू शकले नसेन तर मोठ्या दिलानं तुम्ही मला माफ कराल अशी मी आशा करते."

पुढे ती लिहिते की, "कालचा दिवस खरंच तुमच्या शुभेच्छांमुळे खास बनला.

असंच प्रेम करत रहा, आशीर्वाद देत रहा! पुन्हा एकदा खुप खुप धन्यवाद!

त. टी.: वाढदिवस काल म्हणजे २६ ॲागस्टला होता, आज नाही याची कृपया मंडळाने नोंद घ्यावी!"

या पोस्टच्या कमेंटमध्ये अनेकांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या अभिनयाचं आणि लूकचं कौतुक केलं आहे.

काही दिवसांपूर्वी हेमांगी रवी जाधव दिग्दर्शित 'ताली' वेबसीरीज मध्ये दिसली. तिची ही सिरिज जियो सिनेमा या ओटीटीवर रिलीज झाली.

यात स्वाती ही भूमिका साकारत तिने पुन्हा एकदा तिच्या अभिनयाचं प्रेक्षकांची मन जिंकली. त्याचबरोबर हेमांगीची दो गुब्बारे ही वेब सीरिज देखील रिलिज झाली आहे.

सध्या ती ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेत काम करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Girish Mahajan: ‘तुमचे घोडे नेमके कुठे अडले, मला कळत नाही’; सावळीविहीर रस्त्याच्या प्रश्नावर गिरीश महाजन आक्रमक

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

SCROLL FOR NEXT