hemangi kavi shared post about her first love and her favourite red colour  sakal
मनोरंजन

पहिल्या प्रेमाबद्दल हेमांगी कवीची पोस्ट.. म्हणाली, माझ्या आयुष्यात..

हेमांगीची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

नीलेश अडसूळ

hemangi kavi : हेमांगी कवी हे मराठी मनोरंजन विश्वातील एक महत्वाचं नाव. अनेक मालिका, चित्रपट, नाटक तिच्या कसदार अभिनयाने गाजले आहेत. अभिनयासोबतच निरनिराळ्या कारणाने ती चर्चेत असते. ती अत्यंत परखडपणे आपले पुरोगामी विचार लोकांपर्यंत पोहचवत असते. त्यामुळे बऱ्याचदा तिला खूप ट्रॉल केले जाते. तर कधी तिच्या बेधडकपणामुळे कौतुकाची थापही तिला मिळते. आज हेमांगी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आज तिने आपल्या पहिल्या प्रेमाची कबुली दिली आहे. तीची ही पोस्ट सध्या अनेकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.

(hemangi kavi shared post about her first love and her favourite red colour )

हेमांगीने यावेळी लाल रंगाचा वनपीस परिधान केला आहे. तर वेगवगेळ्या पोज देऊन हेमांगीने हं ए फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यासोबत तिने एक कॅप्शनहि दिले आहे. ती म्हणते, 'लहानपणी (अलीकडे या शब्दाचा वापर अधिक व्हायला लागलाय.. हे लक्षात आलंय माझ्या) तर माझ्या लहानपणी मला कुणी विचारलं की " तुझा आवडता रंग कुठला?" तर मी म्हणायचे 'लाल'. ठरलेलं उत्तर. या रंगाबद्दल कधी एवढं आकर्षण निर्माण झालं माहीत नाही पण solid आवडायचा हा रंग. तुम्हांला खोटं वाटेल पण माझ्याकडे 90 % गोष्टी लाल रंगाच्या असायच्या! कपडे, पेन, शाई, दप्तर, water bottle म्हणजे u name it आणि माझ्याकडे ते लाल रंगाचं असायचं! अरे हो! रक्ताचा रंग लाल, हृदयाचं चित्र काढलं तर ते लाल, गुलाब लाल, जास्वंद लाल, प्रेमाचा रंग लाल, जगात सगळ्यात भारी रंग म्हणजे लाल असला बालिश युक्तिवाद मी मांडायचे!'

पुढे ती म्हणते, 'अजूनही shopping ला गेलं की माझा पहिला हात लाल रंगाच्या वस्तू, कपड्यांकडे जातो! College ला गेल्यावर तर काय रंगच रंग, अनेक छटा, पोत पण तरीही लाल रंगाची जागा ही वेगळीच होती. काही वर्षांनी ती जागा काळ्या रंगाने घेतली. मला वाटलं चला लालचा सोस सुटला पण नाही!!! कितीही ठरवलं नाही घ्यायचा लाल रंग तरीही कुठल्या ना कुठल्या मार्गे हा लाल रंग शिरतोच माझ्या आयुष्यात!

'काय करणार... मेरा पेहला प्यार जो है! मित्र परिवार गमतीत म्हणतात 'म्हणूनच तू लाला नावाच्या माणसाशी लग्न केलंस!' असं म्हणतात लाल रंग सावळ्या रंगाला शोभत नाही! मला हे कधीच पटलं नाही! मुळात कुठलाही रंग जर आपण नीट carry केला तर तो छानच दिसतो आणि त्यात जर आपला आवडता रंग असेल तर आपण 'कमालच' दिसतो! हो की नाही?' अशी पोस्ट करत लाल रंग हे तिचं पहिलं प्रेम असल्याची ती कबुली देते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

राजकुमार रावचं झालं प्रमोशन! अभिनेता होणार बाबा; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज

SCROLL FOR NEXT