Hemant Dhome retro dance on ashok saraf famous song tujhi majhi jodi jamli g for phakaat marathi movie
Hemant Dhome retro dance on ashok saraf famous song tujhi majhi jodi jamli g for phakaat marathi movie sakal
मनोरंजन

Hemant Dhome: अशोक मामांच्या 'त्या' सुपरहिट गाण्यावर थीरकला हेमंत ढोमे.. व्हिडिओ व्हायरल..

नीलेश अडसूळ

Hemant Dhome phakaat movie song: हेमंत ढोमे कायमच चर्चेत असणारा अभिनेता आहे. लवकरच तो 'फकाट' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच चित्रपटाचे एक दमदार गाणे नुकतेच भेटीला आले आहे. अशोक सराफ यांचे गाजलेले गाणे 'तुझी माझी जोडी जमली' या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे.

विशेष म्हणजे या गाण्यावर हेमंत ढोमे आणि अभिनेत्री अनुजा साठे यांनी भन्नाट डान्स केला आहे. हे गाणे पाहून आपण पुन्हा भूतकाळात डोकावतो. कारण जुन्या गाण्याप्रमाणेच हे गाणे देखील बागेत आणि त्याच वेशभूषेत चित्रित करण्यात आले आहे. या गाण्याचा व्हिडिओ सध्या भलताच व्हायरल होत आहे.

(Hemant Dhome retro dance on ashok saraf famous song tujhi majhi jodi jamli g for phakaat marathi movie)

श्रेयश जाधव दिग्दर्शित 'फकाट' चित्रपटातील सगळे कलाकार समोर आल्यानंतर या चित्रपटातील एक जबरदस्त गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 'तुझी माझी जोडी' असे गाण्याचे बोल असणाऱ्या हर्षवर्धन वावरे आणि कस्तुरी वावरे यांनी गायले असून शांताराम नांदगावकर आणि हर्ष, करण, आदित्य या 'ट्रिनिटी ब्रदर्स' यांनी या गाण्याला शब्दबद्ध केले आहे. तर या गाण्याला 'ट्रिनिटी ब्रदर्स'चेच संगीत लाभले आहे.

हेमंत ढोमे आणि अनुजा साठे यांच्यावर चित्रित करण्यात आलेले हे गाणे ऐंशीच्या दशकात नेणारे आहे. उडत्या चालीचे हे गाणे ऐंशीच्या काळातील सुपरहिट गाणे असून ते रिक्रिएट करण्यात आले आहे. हे रेट्रो लूकमधील गाणे पाहाताना आणि ऐकताना संगीतप्रेमींना त्याच काळात गेल्याचा अनुभव येईल.

या गाण्याबद्दल ट्रिनिटी ब्रदर्स म्हणतात, "अनेक जुनी गाणी पुनर्रचित करून, ती नव्याने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे सध्या फॅड आहे. आम्हीही या गाण्यातून असाच प्रयत्न केला आहे. परंतु यात आम्ही या गाण्याला नवीन स्वरूपात न आणता अगदी जसेच्या तसे समोर आणले आहे, अगदी कलाकारांचे नृत्य, पेहरावही तसेच आहे. अर्थात काही छोटे बदल आहेत, जे प्रेक्षकांना दिसतीलच. रेट्रो फील देण्याचा आमचा हा प्रयत्न प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.''

वक्रतुंड एन्टरटेनमेंट्स, गणराज स्टुडिओ प्रस्तुत, निता जाधव निर्मित, 'फकाट' या चित्रपटात हेमंत ढोमे, सुयोग गोऱ्हे, अविनाश नारकर, अनुजा साठे, रसिका सुनील, कबीर दुहान सिंग, नितीश चव्हाण, किरण गायकवाड आणि महेश जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हायली कॉन्फिडेन्शिअल धिंगाणा असलेला हा चित्रपट येत्या १९ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: विधानसभेपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार? बंडखोर ठाकरे-पवारांकडे परतणार?

केदार जाधवने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून केली निवृत्तीची घोषणा

Election Commission : ''सिस्टीममध्ये कुठलीही चूक होऊ शकत नाही'', मतमोजणीच्या तयारीबद्दल मुख्य आयुक्त राजीव कुमार म्हणाले...

Priyanka Chopra Beauty Tips: चमकदार त्वचेसाठी देसी गर्लने शेअर केली बॉडी स्क्रब बनवण्याची सोपी पद्धत

Bengluru Viral Video : बंगळुरूमध्ये कोकोनट अटॅकरची दहशत ; भरदिवसा गाडी फोडली, व्हायरल होतोय व्हिडीओ

SCROLL FOR NEXT