hemant dhome special post for wife kshitee jog who worked in rocky aur rani ki prem kahani  SAKAL
मनोरंजन

Hemant Dhome: पाटलीणबाई, प्रिमियर शो ला तुझ्या सोबत आलो अन्.. बायकोचा सिनेमा पाहून हेमंत ढोमेची लय भारी पोस्ट

हेमंत ढोमेची बायको क्षिती जोग रॉकी और रानी की प्रेम कहानी मध्ये झळकत आहे

Devendra Jadhav

Rocky aur Rani ki Prem Kahani News: रणवीर सिंग आणि आलिया भटची प्रमुख भुमिका असलेला रॉकी और रानी की प्रेम कहानी सिनेमा काल शुक्रवार २८ जुलैला रिलीज झाला. या सिनेमात मराठमोळा अभिनेता हेमंत ढोमेची पत्नी क्षिती जोग सुद्धा काम करत आहे. यानिमित्ताने हेमंत ढोमेने बायको क्षितीचं कौतुक केलंय

(Hemant Dhome special post for wife kshitee jog who worked in rocky aur rani ki prem kahani)

हेमंत लिहीतो.. पाटलीणबाई, आज तुझ्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा दिवस! करण सरांच्या ॲाफिस मधून फोन आल्याचं तू मला सांगितलंस आणि घाई घाईत लुक टेस्ट आणि त्यांच्याबरोबरची तुझी मिटींग आणि तारखा आणि बाकी सगळं ठरलं बघता बघता सिनेमाचं शूट झालं… हा सगळा प्रवास मी जवळून पाहिला… प्रिमियर शो ला तुझ्या सोबत आलो… “He is my husband!” अशी तू सगळ्यांना ओळख करून देत होतीस… काय भारी फिलींग होतं ते! त्या शो नंतर कोण कोण येऊन तुझं कौतुक करत होते… काय कमाल वाटत होतं!

हेमंत पुढे लिहीतो, आज आपण आपल्या मित्रांसोबत सिनेमा पाहिला… तुझं काम आज पुन्हा एकदा बारकाईने बघत होतो! तुझी आजवरची मेहनत, स्वतःच्या जिवावर सारंकाही करण्याची जिद्द हळू हळू फळाला येतेय… सिनेमा संपल्यावर गर्दीतून लोक तुला भेटायला आले आणि त्या साऱ्यांनी तुझ्या साठी टाळ्या वाजवल्या… त्या टाळ्या कधी संपुच नयेत असं वाटत राहिलं… तुझं कौतुक कधीच थांबु नये असं वाटत राहिलं…हे सारं मी साठवून ठेवलंय कायमचं आणि आज तुला आवडत नसताना ही पोस्ट लिहीतोय… इतक्या भव्य दिव्य सिनेमात, एवढ्या मोठ्या नटांमधे, त्या सगळ्या झगमाटात तू लख्खं चमकत होतीस… तुझ्या कामाने! कमाल!

हेमंत शेवटी लिहीतो, क्षिती मला तू कायमंच आनंद दिलायस पण रॉकी आणि रानी की प्रेम कहानी या चित्रपटाबद्दल Thank you! आपणंच हे सारं केलंय, हे सग्गळं आपलंच यश आहे असं खुळ्यागत वाटणारा तुझा या जगातला सगळ्यात मोठा चाहता…खूप खूप मोठी हो, love you! (टिपः सिनेमा लवकरात लवकर बघा आपल्या क्षितीचं काम तुम्हाला नक्की आवडेल!)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT