Hi Anokhi Gaath 
मनोरंजन

Hi Anokhi Gaath Trailer Out: नात्यांची गुंतागुंत; महेश मांजरेकरांच्या "ही अनोखी गाठ" चा ट्रेलर रिलीज; 'या' दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित

Hi Anokhi Gaath: "ही अनोखी गाठ" (Hi Anokhi Gaath) या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

priyanka kulkarni

Hi Anokhi Gaath: अभिनेता श्रेयश तळपदे (Shreyash Talpade) आणि अभिनेत्री गौरी इंगवले (Gauri Ingawale) यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या "ही अनोखी गाठ" (Hi Anokhi Gaath) या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. या ट्रेलरमध्ये नात्यांची गुंतागुंत दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. आता प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.

"ही अनोखी गाठ" या चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला अभिनेता श्रेयस हा श्रीनिवास लिमये या वकीलाच्या भूमिकेत दिसतो. तर गौरी ही एका डान्सरच्या भूमिकेत दिसत आहेत. या दोघांचे लग्न मानाविरुद्ध लग्न होतं. यानंतर पुढे काय होते, हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना थिएटरमध्ये हा चित्रपट बघावा लागेल.

कधी रिलीज होणार चित्रपट?

"ही अनोखी गाठ" या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं आहे. हा चित्रपट 1 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात गौरी आणि श्रेयस यांच्यासोबतच ऋषी सक्सेना आणि शरद पोंक्षे यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.

पाहा ट्रेलर:

श्रेयसचे आगामी चित्रपट

श्रेयसच्या "ही अनोखी गाठ" या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. श्रेयस हा वेलकम टू द जंगल या चित्रपटामधून देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय कुमार, रवीना टंडन, जॅकलीन फर्नांडीज, दिशा पटानी, सुनील शेट्टी, परेश रावल, लारा दत्ता आणि अरशद वारसी हे कलाकार देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट 2024 मध्ये रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: पुणे जिल्ह्यात दाेन दिवसांपासून अवकाळीने शेतीचे नुकसान: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अँक्शन मोडवर, तातडीने पंचनाम्याचे निर्देश!

Dhurandhar 2 ने पहिल्याच दिवशी कमावला 'इतक्या' कोटींचा गल्ला, बॉलिवूडच्या ओपनर सिनेमांचे सगळे रेकॉर्ड मोडले

Alphonso Mango Price : हापूसचा 'रुबाब' वाढला! 5 हजारांपासून 12 हजारांपर्यंत एक पेटी; सोन्याच्या दरात विकला जातोय कोकणचा राजा

Accident News : देवदर्शन ठरले अखेरचे ! भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांंचा दुर्दैवी मृत्यू

Jalna News: परतूर तालुक्यात कामगार योजनेत मनमानी; वर्ष उलटले तरीही क्लेम रखडलेले

SCROLL FOR NEXT