aryan memes twitter
मनोरंजन

आर्यनच्या सुटकेनंतर भन्नाट मीम्सचा पाऊस; तुम्हालाही अनावर होईल हसू!

ढोलताशांच्या गजरात आर्यनचं 'मन्नत'वर स्वागत

स्वाती वेमूल

क्रुझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाल्यानंतर अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनची आज (शनिवार) आर्थर रोड कारागृहातून सुटका झाली. सकाळी ११ च्या सुमारास आर्यन कारागृहातून बाहेर पडला. शाहरुख खान त्याला घेण्यासाठी आर्थर रोड कारागृहाजवळ गेला होता. २० दिवसांहून अधिक काळ कारागृहात राहिलेल्या आर्यनचं 'मन्नत' या बंगल्यावर जंगी स्वागत करण्यात आलं. ढोलताशांच्या गजरात आर्यनचं स्वागत झालं. शुक्रवारी रात्री मन्नत बंगल्याला रोषणाई करण्यात आली होती. तर चाहत्यांनीही बंगल्याबाहेर मोठी गर्दी केली. एकंदर या संपूर्ण घडामोडी पाहिल्यानंतर सोशल मीडियावर त्यावरून अनेक भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत.

ड्रग्ज प्रकरणातून कारागृहातून आर्यनची सुटका झाल्यानंतर आई गौरी खान मन्नतवर त्याचं स्वागत कशा पद्धतीने करणार, यावरून अनेक मीम्स व्हायरल होत आहेत. 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटातील एका दृश्यावरून हे मीम्स तयार करण्यात आले आहेत. आर्यनच्या सुटकेनंतर सोशल मीडियावर सेलिब्रिटींसोबतच नेटकऱ्यांच्याही प्रतिक्रिया येत आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाने एक लाख रुपये जातमुचलका आणि अटी-शर्तींवर आर्यनला जामीन मंजूर केला आहे. आर्यनसह त्याचा मित्र आणि ड्रग्ज प्रकरणातील सहआरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र या दोघांची अद्याप कारागृहातून सुटका झालेली नाही. उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करताना १४ अटी घातल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT