Vicky Katrina memes twitter
मनोरंजन

विकी-कतरिनाच्या लग्नावर भन्नाट मीम्स व्हायरल; पोट धरून हसाल!

'हे लग्न म्हणजे जणू सिक्रेट मिशनच'; नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

स्वाती वेमूल

बॉलिवूड इंडस्ट्रीत आणि नेटकऱ्यांमध्ये सध्या जोरदार चर्चा आहे, ती म्हणजे विकी कौशल Vicky Kaushal आणि कतरिना कैफ Katrina Kaif यांच्या लग्नसोहळ्याची. राजस्थानमध्ये धूमधडाक्यात पार पडणाऱ्या या लग्नसोहळ्याविषयी प्रत्येक बारिकसारिक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. या लग्नाविषयी अद्याप विकी किंवा कतरिनाने कोणतीही अधिकृत माहिती दिली नसल्याने हे 'जणू सिक्रेट मिशन'च असल्याचं म्हणत नेटकरी भन्नाट मीम्स व्हायरल करत आहेत. हे मीम्स पाहून तुम्हीसुद्धा पोट धरून हसाल. Vicky Katrina wedding

जयपूरमध्ये ९ डिसेंबर रोजी विकी-कतरिना लग्नगाठ बांधणार असल्याचं कळतंय. मात्र या लग्नसोहळ्याला हजेरी लावणाऱ्या पाहुण्यांना विकी-कतरिनाने बऱ्याच अटी घातल्या आहेत. पाहुण्यांना काटेकोरपणे त्याचं पालन करावं लागणार आहे. या अटींच्या पार्श्वभूमीवर व्हायरल झालेले भन्नाट मीम्स-

काय आहेत या अटी?

लग्नात उपस्थित असल्याचा खुलासा करू नये

लग्नसमारंभातील फोटो काढू नये

सोशल मीडियावर फोटो शेअर करू नये

सोशल मीडियावर लोकेशन शेअर करू नये

जोपर्यंत तुम्ही विवाहस्थळ सोडत नाही तोपर्यंत बाहेरील जगाशी संपर्क करू नये

लग्न नियोजकांच्या मंजुरीनंतरच सर्व फोटो प्रकाशित केले जातील

लग्नाच्या ठिकाणी कोणतेही इन्स्टा रील किंवा व्हिडिओ बनवता येणार नाहीत

विकी आणि कतरिनानं लग्नासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केल्याची बाबही समोर आली आहे. कतरिना आणि विकीनं लग्नासाठी एक दोन नव्हे तर 45 हॉटेल्स बुक केली आहेत. राजस्थानमधील सिक्स सेन्सेस फोर्ट बरवारा, सवाई माधोपूर याठिकाणी बॉलिवूडमधील हे सर्वांत मोठं लग्न होणार असल्याचं कळतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT