himanshi 
मनोरंजन

हिमांशी खुरानाने तिच्या चाहतीच्या निधनावर व्यक्त केलं दुःख..

सकाळ डिजिटल टीम

मुंबई- सध्या कोणत्या सेलिब्रिटीला यशाच्या शिखरावर पोहोचवायचं आणि कोणत्या सेलिब्रिटीला नाकारायचं हे सगळं चाहत्यांवर आहे. कोणत्याही कलाकारांच्या करिअरमध्ये चाहत्यांची भूमिका महत्वाची असते. आणि सध्याचे सेलिब्रिटी देखील त्यांच्या चाहत्यांसाठी उत्सुक असतात. त्यांच्या आनंदासाठी काहीही करायला तयार असतात. नुकतंच बिग बॉस १३ ची माजी स्पर्धक हिमांशी खुरानाच्या एका चाहत्यांचं निधन झालं आहे. या चाहत्याच्या निधनावर हिमांशीने दुःख व्यक्त केलंय. त्यामुळे सोशल मिडियावर देखील हिमांशीच्या स्वभावाचं कौतुक होतंय.

२३ जून रोजी हिमांशीच्या एका फॅन क्लबने ट्वीटवर माहिती दिली की हिमांशीची जबरदस्त चाहती असलेल्या स्तुती अरोराचं निधन झालं आहे. तिच्या फॅन क्लबने अशी देखील माहिती दिली आहे की या चाहतीचं निधन कोरोना व्हायरच्या संसर्गामुळे झालं आहे. फॅन क्लबच्या म्हणण्यानुसार स्तुती अरोरा सोशल मिडियावर हिमांशीची मोठी चाहती असण्यासोबतंच सगळ्यात सक्रिय सदस्यांपैकी एक होती. 

फॅन क्लबचं हे ट्विट पाहिल्यानंतर हिमांशीने लगेचच उत्तर दिलं आहे. तिने लिहिलंय, रेस्ट इन पीस. या लाईनसोबतंच हिमांशीने  दुःखी चेहरे असलेले इमोजी देखील पोस्ट केले आहेत. सोशल मिडियावर हिमांशीच्या या पोस्टचं चाहत्यांकडून चांगलंच कौतुक होत आहे. हिमांशीचे इतर चाहतेही कोरोनामुळे निधन झालेल्या स्तुती अरोराच्या मृत्युवर शोक व्यक्त करत आहेत. 

हिमांशी खुराना नुकतीच बिग बॉस १३ मध्ये दिसून आली होती. बिग बॉसमध्ये ती आसिम रियाजसोबतच्या रिलेशनशिपमुळे चांगलीच चर्चेत राहिली होती. बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर सोशल मिडियावर हिमांशी प्रसिद्ध झाली. हिमांशीने आसिमसोबत एक म्युझिक अल्बम देखील केला. काला सोहना नई आणि ख्याल रख्या कर या गाण्यांमधून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली.    

himanshi khurana expressed grief over the death of his fan  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगात युद्धाची धग, दिल्लीत शांततेचा संदेश; BRICS परिषदेत झाले 'हे' ५ मोठे निर्णय, भारताला काय मिळालं?

Pune Ganeshotsav security: पुण्यात गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ७०१ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

IND vs AFG, 1st T20I: बुमराह, सॅमसनचे कमबॅक, पण वैभव सूर्यवंशीला संधी नाही; कशी आहे भारताची Playing XI?

Marathi News Live Updates : आखाती देशांना इराणसोबत करार करायचा असेल, तर त्यांनी तो करावा- डोनाल्ड ट्रम्प

Amit Shaha UCC : अमित शहांची मोठी घोषणा ! २०२९ पूर्वी २१ राज्यांत समान नागरी कायदा लागू करणार; घुसखोरांना देशातून हाकलणार

SCROLL FOR NEXT